
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांची आई श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या निधनाच्या दिवशी आईसाठी नामजपादी उपाय करणे आणि साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावाही घेणे
‘९.१.२०२६ या दिवशी दुपारी २.०८ वाजता सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आई श्रीमती प्रभावती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. त्या दिवशी सकाळपासूनच सद्गुरु राजेंद्र शिंदे आईजवळ बसून नामजपादी उपाय करत होते.

त्याच दिवशी सकाळी १० ते ११ या कालावधीत सद्गुरु राजेंद्रदादांनी आमच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेतला. ते ‘आईच्या लिंगदेहाला पुढे जाण्यात कोणताही अडथळा येऊ नये’, या दृष्टीने नामजपादी उपायही करत होते आणि त्याच वेळी साधकांचा आढावा घेऊन त्यांना साधनेची दिशाही देत होते. या प्रसंगातून ‘संत आणि सद्गुरु हे साधकांना साधनेत पुढे नेण्यासाठी अन् त्यांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर येऊन सगुणातील कार्य करत आहेत’, हे लक्षात येते.

मी सद्गुरु राजेंद्रदादा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंकर राजाराम नरुटे (१९.१.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !