जकार्ता (इंडोनेशिया) येथील प्रवचनात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा दावा

जकार्ता (इंडोनेशिया) – श्रीराममंदिरातील सध्याची परिस्थिती पहाणे कोणत्याही सनातनी व्यक्तीसाठी असाह्य आहे. श्रीराममंदिरात अशी परिस्थिती पाहून भक्तांच्या मनाला काय यातना होत असतील ?, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. लोक म्हणतात की, ‘बाबा तर काहीच बोलत नाहीत. बाबा तुम्हाला तर सर्व ठाऊक आहे, मग चिठ्ठी उघडा आणि कुणाचे नाव आहे ते सांगा.’ जर आम्ही आता चिठ्ठी उघडून नाव सांगितले, तर ते (दोषी) आम्हाला संपवून टाकतील. आज नाही, तर उद्या संपवतील; मग आम्ही इतरांची नावे सांगण्यासाठी जिवंतच रहाणार नाही; म्हणूनच काही ठिकाणी आमच्यासाठी गप्प बसणेच श्रेयस्कर असते, असे विधान बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे एका प्रवचनाच्या वेळी केले.
Ram Mandir Donation Case: "If I reveal the big names behind the Ram Temple donation theft, they will kill me!"
Speaking in Jakarta, Bageshwar Dham's Pandit Dhirendra Krishna Shastri claimed India's law catches "small fish while big crocodiles escape," adding he faces a life… https://t.co/pEYuTGsSPS pic.twitter.com/zTIwNTKC3i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 30, 2026
सध्या केवळ छोटे मासे पकडले गेले आहेत !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, भारतातील कायदा कोळ्याच्या जाळ्यासारखा आहे, ज्यामध्ये केवळ छोटे मासे अडकतात आणि मोठ्या मगरी सहज निसटून जातात. या संपूर्ण प्रकरणातील दोषींना मी चांगल्या प्रकारे ओळखतो. मी सध्या एका मोठ्या धर्मसंकटात आहेत; कारण सत्य सांगितल्यास जिवाला धोका आहे आणि शांत राहिल्यास लोक माझ्या शक्तींवर बोट ठेवतात.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस