आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा

नसरापूर (पुणे) येथे बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी २५ जूनला न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कांबळे याला दोषी ठरवले होते, तसेच अंतिम निकाल राखून ठेवला होता. २९ जूनला त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचे मान्य केले.

हे ही वाचा → संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !

नसरापूर येथे ही घटना १ मे या दिवशी घडली होती. राज्याच्या इतिहासत अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल लागणारा हा सर्वांत वेगवान खटला ठरला आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रत्येक प्रकरणात दोषीला हीच शिक्षा झाली पाहिजे, तरच खरा न्याय मिळाल्याची भावना जनतेत निर्माण होईल !