
नवी देहली – देशभरातील विविध राज्यांत लव्ह जिहादच्या ७ घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये धर्मांध मुसलमान युवकांनी हिंदु मुलींची फसवणूक केल्याचे, त्यांच्यावर धर्मांतरसाठी दबाव आणल्याचे, तसेच त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले.
🚨 Love Jihad: Myth or a Pre-planned Conspiracy? 🚨
Those who dismiss “Love Jihad” as mere slogans need to confront the chilling reality.
Here are 7 recent cases from 5 states that reveal a disturbing, recurring pattern: false identities, deception, forced conversions, and… pic.twitter.com/QDHdqcCn1Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 23, 2026
१. देहली
येथील बुराडी भागातील ३६ वर्षीय विवाहित हिंदु महिलेशी इन्स्टाग्रामवरून ‘सन्नी’ उपाख्य शाकीब जरदारी याने मुसलमान ओळख लपवून मैत्री केली. महिला ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’ असल्याने व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केले. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणत मदरशातही नेले. पीडितेच्या पतीने तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
२. हरियाणा
फरिदाबाद : बिहारमधील मुझ्झफरपूरमधील एका मशिदीच्या कमर राजा नावाच्या काझीने (इस्लामी कायदेतज्ञाने) खोटी ओळख सांगून हिंदु मुलीला फसवले, तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ काढून तिच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली. फरिदाबाद पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली.
अलीगड : जिल्ह्यातील रोरावर येथे एका मुसलमानाने स्वत:ची ओळख लपवून देहलीतील हिंदु महिलेला जाळ्यात ओढले, तिच्याशी मंदिरात विवाह केला. पुढे खरी ओळख उघड झाल्यावर तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणला, तलाक दिला, तसेच इतर पुरुषांसमवेत ‘हलाला’ (तलाक दिल्यानंतर त्या महिलेशी पुन्हा विवाह करायचा असेल, तर त्यापूर्वी तिला दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो. या प्रथेला हलाला म्हणतात) करण्यासाठी बाध्य करण्याचा प्रयत्न केला.
३. उत्तरप्रदेश
कानपूर : जिल्ह्यातील घाटमपूर येथे साहिल नावाच्या युवकाने इस्लामी ओळख लपवून एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केला. तिच्यावर धर्मांतरासाठी दबावही आणण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पसार साहिल आणि त्याचा भाऊ यांचा शोध घेतला जात आहे.
बहराईच : जिल्ह्यातील धरसवां शेखुवापूर गावातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणी लतीफ अहमद उपाख्य मोनू याला अटक करण्यात आली. पीडितेचे ३ दिवसांआधी अपहरण करण्यात आल्याने येथील संतप्त हिंदूंनी मोनूच्या घरावर दगडफेक केली होती. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत पीडितेचा शोध घेतला.
४. मध्यप्रदेश
अलीराजपूर : शकील नावाच्या युवकाने एका आदिवासी हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फासले. विवाह करण्याच्या बहाण्याने तिला राजस्थानमधील अजमेर येथे नेऊन धर्मांतरासाठी दबाव आणला. त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक रघुवंश सिंह भदोरिया यांनी दिली.
५. गुजरात
मेहसाणा : जिल्ह्यातील खेरालू भागात महंमद जावेद याने ‘राहुल’ बनून एका २० वर्षीय हिंदु तरुणीवर बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याच्या नावाखाली हॉटेलवर बोलावले. काही लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी जावेदला रंगेहात पकडले आणि चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि मारहाण अशा दोन्ही प्रकरणांत गुन्हा नोंदवला आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !