
बदलापूर (ठाणे), २३ जून (वार्ता.) – शासनाच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत संमत झालेल्या घरांचे बांधकाम चालू असतांना काही मुसलमानांनी मालकी हक्काचा दावा करत आदिवासी कुटुंबांच्या घरांच्या भिंती दोनदा पाडल्या. हा प्रकार बदलापूरजवळील मूळगाव परिसरात घडला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबे भयभीत झाली; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर घराचे बांधकाम पुन्हा चालू करण्यात आले.
१. मूळगाव परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबे मागील ३ – ४ पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. घरकुल योजनेतून त्यांना घरकुल संमत झाल्यानंतर संबंधित जागेवर बांधकाम चालू होते; मात्र ‘ही जागा आमच्या मालकीची आहे’, असा दावा शेजारी रहाणार्या मुसलमानांनी करत बांधकामास विरोध केला. त्यांनी उभारलेल्या भिंती पाडल्या.
२. त्रस्त झालेल्या आदिवासी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी वाद न घालता घडामोडींचे चित्रीकरण करण्याचा सल्ला देत बांधकाम चालू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा मुसलमानांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून काम चालू ठेवण्यास साहाय्य केले.
३. पोलिसांनी मुसलमानांकडे भूमी मालकीची कागदपत्रे मागितल्यावर ते ती देऊ शकले नाहीत. (अशा कायदाद्रोही मुसलमानांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) २ वेळा बांधकाम पाडण्यात आल्याने आदिवासी कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल ! – Yogrishi Ramdev baba
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Gyanvapi Mathura Sambhal Dispute : काशी, मथुरा आणि संभल येथील मंदिर-मशीद वादामध्ये सर्वाेच्च न्यायालयाचा मध्यस्थीचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी फेटाळला