वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे गंगा नदीच्या मध्यभागात चिकन खाल्ले गेले आणि दारू पार्टी करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना अटक केली आहे. तसेच नौकाही जप्त केली. ही घटना दशाश्वमेध घाटाजवळील आहे.
🚨 Desecration of Holy River Ganga: 5 Hindu youths arrested for holding a meat and alcohol party on a boat.
Previously, an incident came to light where Muslim youths held an Iftar party on a boat in Varanasi, ate chicken biryani, and threw bones into the Ganga. Now, Hindus have… https://t.co/2Gy4K4VUq5 pic.twitter.com/T9N7lFcfrg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 23, 2026
१. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सर्व पाचही आरोपी नौकेमध्ये चिकन आणि दारू पार्टी करतांना दिसत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दीपक कुमार, अजय साहनी, अरुण कुमार साहनी, अनुराग निषाद आणि राहुल साहनी यांचा समावेश आहे. या सर्वांचे वय २५ ते ३२ वर्षांच्या दरम्यान आहे.
२. दशाश्वमेधचे साहाय्य पोलीस आयुक्त अतुल अंजान त्रिपाठी यांनी सांगितले की, व्हिडिओ पाहिल्यानंतर तो जुना असल्याचे वाटत आहे. या व्हिडिओमध्ये भाजपचे नगरसेवक कुठेही दिसत नाहीत; मात्र ती नौका त्यांची किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची नक्कीच आहे.
३. यापूर्वीही वाराणसीमध्ये गंगा नदीत मुसलमानांकडून इफ्तार पार्टी करण्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. त्या तरुणांनी चिकन बिर्याणी खाऊन हाडे गंगा नदीत फेकली होती.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार