
‘वंग आमचा खरा सहोदर’, असे लोकमान्य टिळक यांचे एक वचन आहे, अर्थात् ‘बंगाल हा आमचा खरा सहकारी असून सर्व सुख-दु:खातील वाटेकरी आहे’, असा ढोबळ मानाने त्याचा अर्थ होतो. त्याकाळी बंगाल हे अखंड हिंदुस्थानचे अविभाजित असे अंग होते; परंतु आता तशी परिस्थिती नाही. वर्ष १९४७ मध्ये प्रथम पाकिस्तानची निर्मिती आणि नंतर वर्ष १९७१ मध्ये भारतीय सैन्याच्या अनेक सैनिकांना वीरगती मिळाल्यावर स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. असे असले, तरी तेथे अद्यापही हिंदूंवर अनन्वित अत्याचार सातत्याने होत आहेतच. यानंतर ‘कुणीही यावे आणि टपली मारून जावे’, अशी भारतातील बंगालच्या हिंदूंची अवस्था झाली होती अन् ही अवस्था अनुमाने गेली ५० वर्षे होती. जेव्हा अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा त्याचा बीमोड करण्याकरता सर्व शक्ती एकवटली जाते आणि त्या शक्तीचा विजय होत असतो, याला इतिहास साक्षी आहे.

आज बंगालमध्ये हिंदु समाजाकडून विरोधी वा भ्रष्टाचारी नेत्यांविषयी जो काही उद्रेक होत आहे, तो त्यामुळेच पहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार, नेते, मंत्री, गुंड यांनी हिंदूंवर वेळोवेळी अनन्वित अत्याचार केले आणि धर्मांधांचे प्रमाणापेक्षा अधिक लांगूलचालन केले. धर्मांधांनी कोणताही गुन्हा करू दे, त्यांना नेहमीच झुकते माप दिले. त्यामुळे हिंदूंकडून आता उद्रेक होऊन तृणमूल काँग्रेसचे नेते, आमदार आणि माजी मंत्री यांना मारहाण होत आहे. बंगालमधील हिंदूंचा हा उद्रेक, म्हणजे कदाचित् येणार्या नवीन काळाचा प्रारंभ असू शकतो. ज्यांनी आतापर्यंत हिंदूंवर अत्याचार केले आहेत, त्यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा येणारा काळ हा त्यांच्याकरता अत्यंत भयानक असेल. त्यांच्यावर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते. एक पुष्कळ सुंदर वचन आहे, ‘सत्तेला अस्थिरतेचा शाप असतो, धनाला वैषम्याचे पाप असते; परंतु ज्ञानपूर्ण त्यागाला शांती आणि समाधान यांचे भांडार असते.’
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई. (१४.६.२०२६)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !