७.६.२०२६ या दिवशी रामू गणपति मिसाळ यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. १८.६.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. वर्धिनी गोरल (कै. रामू मिसाळ यांची मुलगी, वय २९ वर्षे), फोंडा, गोवा.
१ अ. परिस्थिती बेताची असूनही सेवारत रहाणे आणि मुलांवर साधनेचे संस्कार करणे : ‘वर्ष १९९९ मध्ये माझ्या बाबांनी साधनेला आरंभ केला. ते गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र जागृती सभा यानिमित्त सेवा करत असत. नंतर त्यांनी हळूहळू व्यष्टी साधनेला आरंभ केला. ते गावातील लोकांना साधनेविषयी सांगत असत. आमच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने बाबांना साधनेला फारसा वेळ देता येत नव्हता, तरीही ते वेळ मिळेल, तेव्हा सेवा करत होते. त्यांनी आम्हाला आमच्या लहानपणापासूनच साधना शिकवली. त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले.
१ आ. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे
१ आ १. ६० व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका येणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे : बाबांना वयाच्या ६० व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानंतर त्यांचे आजारपण चालू राहिले. त्यांना ७ वर्षे पुष्कळ त्रास झाला. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय बाबांनी शक्य तितके केले. त्या कालावधीत बाबांनी साधनेचे पुष्कळ प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना थोडे चालता आणि बोलता येऊ लागले.
१ आ २. मूतखड्याचा त्रास होत असल्याने शस्त्रकर्म करून किडनी काढावी लागणे : नंतर बाबांना मूतखड्याचा (‘किडनी स्टोन’चा) त्रास चालू झाला. त्यांना पुष्कळ त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी माझ्या बाबांचे शस्त्रकर्म करून त्यांची ‘किडनी’ काढण्याचा सल्ला दिला. बाबांचे शस्त्रकर्म झाल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि नंतर त्यांच्या अशक्तपणात वाढ होत गेली. त्यांना त्रास सहन होत नसल्याने त्यांचे जेवण अल्प झाले आणि बोलणेही उणावत गेले, तरीही ते नामजप करत होते.

‘बेळगाव येथील रामू गणपति मिसाळ यांनी मुलांवर साधनेचे संस्कार केले. रामू मिसाळ यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरही त्यांनी साधनेचे प्रयत्न तळमळीने केले. शेवटच्या आजारपणात त्यांची स्मरणशक्ती न्यून झालेली असूनही ते सतत नामजप करत असत. ते सतत भावस्थितीत असत. ‘त्यांची साधनेची तळमळ आणि देवाप्रतीचा भाव’, यांमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.६.२०२६)
१ आ ३. ‘परम पूज्य डॉक्टर’ आणि ‘परम पूज्य बाबा’ असा नामजप करणे : बाबांच्या निधनाच्या ४ मास आधीपासून ते झोपलेले असायचे. त्यांची स्मरणशक्ती अल्प झाली होती. त्यांच्या शरिराचा अर्धा भाग हलत नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही घरातील सर्व जण नामजपादी उपाय करत होतो. आम्ही त्यांच्या शेजारी भ्रमणभाषवर अखंड नामजप लावून ठेवत होतो. बाबा केवळ ‘परम पूज्य डॉक्टर’ आणि ‘परम पूज्य बाबा (प.पू. भक्तराज महाराज)’ एवढेच म्हणत होते.
१ आ ४. ‘भावस्थितीत आणि सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे : बाबांच्या निधनाच्या २ मास आधीपासून ‘त्यांच्या चेहर्याचा रंग पिवळा आणि शरिराचा रंग पांढरा होत आहे’, असे आम्हाला जाणवले. त्यांच्याकडे पाहिले असता ‘ते भावस्थितीत आहेत’, असे जाणवत होते. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवत होते. त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. त्यांच्याकडे पाहिले असता ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे पहात आहोत’, असे वाटत होते. आमच्या घरातील वातावरण शांत होते. आमच्याकडून श्री दत्तगुरूंना सतत प्रार्थना होत होत्या. आम्ही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो.
१ आ ५. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. त्यांचे अंत्यविधी व्यवस्थित पार पडले. बाबांच्या निधनानंतर घरातील सर्वांना दुःख झाले; मात्र सर्वांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाता आले.
आ. बाबांच्या निधनाच्या तिसर्या दिवशी अस्थी विसर्जनाच्या वेळी बाबांच्या अस्थी पिवळसर झाल्या असून शेष रक्षा पांढरी असल्याचे आमच्या लक्षात आले.’
२. श्री. ज्योतिबा रामू मिसाळ (कै. रामू मिसाळ यांचा मुलगा) बेळगाव
अ. ‘बाबा रुग्णाईत असतांनाही सकाळी उठल्यावर श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहून सर्व देव, प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना प्रतिदिन प्रार्थना करत असत. त्यांना देवतेचे नाव उच्चारता येत नव्हते. ते केवळ ‘परम पूज्य’ असाच नामजप सतत करत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १०.६.२०२६)
हे ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप आहे !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !