आंदोलकांकडून भारताचे समर्थन

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – महागाई आणि गव्हाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ यांवरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू झालेले आंदोलन आता राजकीय हक्कांच्या मागणीकडे वळले आहे. आतापर्यंत येथील जनता वीज आणि रेशन यांच्या देयकांमुळे त्रस्त होती; परंतु आता काश्मिरी जनतेने पाकिस्तानला या भागातून निघून जाण्यास सांगितले आहे. जनतेने पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीला जोरदार प्रत्युत्तर देण्यास चालू केले आहे.
नुकतेच रावलकोट येथे एक सभा झाली. जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी आणि अवामी ॲक्शन कमिटी यांच्या नेत्यांनी पाकिस्तानवर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा रोखल्याचा आणि संसाधनांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तान भारतासमवेत होणार्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे आणत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जर पाकिस्तान आर्थिक आणि प्रतिदिनचा आवश्यक माल पोचवू शकत नसेल, तर भारतासमवेतचे व्यापारी मार्ग मोकळे केले जावेत.
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !
अमेरिकेकडून इराणच्या १४० सैन्य ठिकाणांवर आक्रमणे