रा.स्व. संघाची नोंदणी करण्याच्या संदर्भातील कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान

त्रिचूर (केरळम्) – संघाचे कार्य अत्यंत उघडपणे चालते. संघाच्या नोंदणीविषयी बोलणे वगैरे सर्व राजकारण चालू असून आम्हाला आता अशा गोष्टींची सवय झाली आहे. संघाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या १० ते १५ वर्षांतच त्याच्या नोंदणीविषयीच्या मागण्या आणि वाद चालू झाले होते. उलट असे आरोप झाले नाहीत, तर आम्हाला काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते. संघाची स्थापना ब्रिटीशकाळात झाली. मूळ हिंदु धर्माचीही कुठे नोंदणी झालेली नाही; जगातील अशा अनेक गोष्टींची नोंदणी झालेली नाही. ज्यांना सरकारकडून निधी किंवा आर्थिक साहाय्य हवे असते, त्यांना नोंदणीची आवश्यकता असते, अशी प्रतिक्रिया प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानावर दिली. खर्गे यांनी म्हटले आहे की, कर्नाटक सरकार रा.स्व. संघासारख्या संघटनांना अधिकृतपणे नोंदणी करणे बंधनकारक करण्याच्या कायदेशीर उपायांचा विचार करत आहे.
"Hindu Dharma itself has not been registered!" – Sarsanghachalak Param Pujya Mohanji Bhagwat on the Karnataka Home Minister’s statement.
"The government knows the Sangh exists. The people know who we are and the service we render." He added.#PriyankKharge #RSS100years https://t.co/5YoPLhSKWg pic.twitter.com/YSlE0cofNC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
प.पू. सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे
१. सरकारला संघाचे अस्तित्व पूर्णपणे ठाऊक आहे !
सरकारला संघाचे अस्तित्व पूर्णपणे ठाऊक आहे; म्हणूनच सरकारने आतापर्यंत संघावर २ वेळा बंदी घातली होती. नंतर न्यायालयाच्या आदेशाने आणि स्वयंसेवकांनी सत्याग्रह केल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली. संघावर बंदी घातली गेली, याचा अर्थच असा की, त्याचे अस्तित्व सरकारला ठाऊक आहे. त्यामुळे अशा राजकीय गोष्टी घडत असतात.
२. लोकांना आम्ही कोण आहोत ? आणि काय काम करतो ?, हे चांगलेच ठाऊक आहे !
गेल्या १०० वर्षांत आम्हाला कुणीही असे सांगितले नाही की, आम्ही नोंदणी केलीच पाहिजे. संघाची लिखित घटना सरकारकडे उपलब्ध आहे, जी आम्ही वर्ष १९५० मध्येच सादर केली होती. त्या वेळी सरकार म्हणू शकले असते की, ‘आधी तुम्ही तुमची संघटना नोंदणीकृत करा आणि मगच आम्ही ही घटना मान्य करू’; पण ते तसे म्हणाले नाहीत. मग आता मी यावर उत्तर का देऊ ? हे सगळे निव्वळ राजकारण आहे आणि या पत्राला गांभीर्याने घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. यातून लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण ते शक्य नाही; कारण लोकांना आम्ही कोण आहोत ? आणि काय काम करतो ?, हे चांगलेच ठाऊक आहे.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार