
कुडाळ, १४ जून (वार्ता.) – आज अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे सर्व ते (धर्मांध) का करत आहेत, तर त्यांना ‘गजवा ए हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीचे युद्ध) करायचे आहे. त्यासाठी त्यांना संख्या वाढवायची आहे. संपूर्ण हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचे आहे. हिंदु मुलींमध्ये जर धर्मप्रेम निर्माण झाले, तर लव्ह जिहादचे भय उरणार नाही. जर देशाला हिंदु राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर माता जिजाऊंची आवश्यकता आहे. आपल्या मुलींना शत्रूबोध करून दिला पाहिजे. एकटी हिंदु जनजागृती समिती काही करू शकत नाही. जर तुम्ही प्रत्येकाने सहभाग दिला, तर ‘बेटी सुरक्षित, तर राष्ट्र सुरक्षित’ अभियान आपण यशस्वी करू आणि सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ‘लव्ह जिहाद’मुक्त जिल्हा घोषित करू, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे काढले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील झाराप येथील आराध्य हॉटेलमध्ये १३ जून या दिवशी ‘लव्ह जिहाद’ याविषयावर आयोजित विशेष व्याख्यानात श्री. शिंदे बोलत होते. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि मुंबई येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्या अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत उपस्थित होत्या. या व्याख्यानाला १ सहस्रहून अधिक हिंदु बंधू-भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या मार्गदर्शनाला उपस्थिती दर्शवली होती.
या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी सांगितले की,
१. केरळमध्ये वर्ष २००६ मध्ये लव्ह जिहादची पहिली तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली. केरळमध्ये जेव्हा ‘इस्लामिक स्टेट’ स्थापन झाले, तेव्हा केरळमधून १३६ जण सिरीया आणि इराकमध्ये गेले होते. त्यात २२ ख्रिस्ती आणि १५ हिंदु अशा एकूण ३८ मुली होत्या. या ३८ मुली अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कह्यात आहेत.
२. आपल्याला शत्रूबोध आणि मित्रबोध हवा, तरच आपण टिकू शकतो. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले, वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार झाले. वर्ष १९९२ मध्ये अजमेरमध्ये सेक्स स्कँडल (वासनाकांड) झाले.
३. त्यांना (धर्मांधांना) हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचे आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हर घर योद्धा’ अभियान चालवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून असे प्रशिक्षण दिले जाईल की, हिंदु बांधव किमान स्वत:चे रक्षण करू शकतो.
४. सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडियाचा) लव्ह जिहादसाठी मोठा प्रभाव पडत आहे. ‘रिलच्या (रिल म्हणजे सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणारे छोटे व्हिडिओ) मागे रिअल (वास्तव)’ आयुष्यात होणार्या घटनांचा अभ्यास करायला हवा. हिंदु मुली सोशल मिडियावरील आभासी जगात फसतात आणि आपल्या आयुष्याची वाट लागून घेतात. मुली आणि पालक यांनी अत्यंत सावध रहायला हवे. मैत्रीच्या नावाखाली धर्मभ्रष्ट करण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत.
५. हिंदु महिला, मुली धर्मभ्रष्ट का होतात? हिंदु मुलींना कायदे माहीत नाहीत. वर्षभरात लाखो मुली देशभरातून गायब होतात. यावर कधी संसदेत चर्चा होतांना दिसत नाही. लव्ह जिहाद थांबवायचा असेल, तर ‘हलाल’ प्रमाणित साहित्य खरेदी करणे थांबवायला हवे; कारण हलालमधून मिळणारा पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जातो.
६. छत्रपती शिवरायांनी जर सर्वधर्मसमभाव जोपासला असता, तर नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना पुन्हा स्वधर्मात घेतले असते का? जे मुसलमान झाले, अशा मावळ्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतले. छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस अनंत यातना सहन करूनही इस्लाम स्वीकारला नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
जीवावर बेतले, तर स्वरक्षणासाठी प्रतिकार करणे, हा आपला घटनात्मक अधिकार ! – अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत, सामाजिक कार्यकर्त्या
सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत म्हणाल्या, ‘‘आपल्या मुलींना सशक्त बनवायचे आहे. एकटीने जिहाद्यांचा सामना करण्याची शक्ती तिच्यात यायला हवी. प्रत्येकाने आपले घर सशक्त केले, तरी समाज सशक्त होऊ शकतो. आता युद्धाचे स्वरूप पालटले आहे. जिहाद आजही चालू आहे. आताही ते लुटत आहेत. लव्ह जिहादच्या शस्त्राच्या माध्यमातून हे चालू आहे. अल्पवयीन मुलींचे ‘ब्रेनवॉश’ अल्पवयीन मुलींच्या माध्यमातूनच केले जात आहेत. आपण सहिष्णु आहोत, हा आपला दोष झाला आहे. आपल्या जीवितावर आणि अब्रुवर घाला घातला जात असेल, तर स्वरक्षणासाठी प्रतिकार करणे, हा आपला घटनात्मक अधिकार आहे. हिंदु कुटुंबाची सर्व माहिती धर्मांधांकडे असते. त्यानुसार धर्मांतरीत करण्यासाठी माणसे पेरली जातात. मुंबईत स्टेशनजवळ मशीद असायला हवी, असा पॅटर्न (पद्धत) आहे. मुंबईत ५० टक्के मुसलमान मुली बी.एड्.साठी प्रवेश घेत आहेत. हिंदु मुलींअभावी मुंबईतील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. भारतात प्रतिदिन १ सहस्र महिला लव्ह जिहादला बळी पडतात. हे थांबवायचे असेल, तर सर्वस्तरांवर जनजागृती झाली पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये

सदगुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘अधर्मापासून आपले रक्षण होण्यासाठी आपण उपाययोजना काढत नाही. जर आपण धर्माचे रक्षण करत नसू, तर धर्म आपले रक्षण कसे करणार? फक्त पैसा प्राण वाचवू शकत नाही. धर्मच आपले रक्षण करू शकतो. त्यासाठी धर्मशिक्षण हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली असून धर्म बाजूला पडला आहे. लव्ह जिहाद करणारे आणि त्याला समर्थन देणारे यांची एक लॉबी आहे. आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. वेळ निघून गेल्यावर आक्रोश करून काही उपयोग नाही. लव्ह जिहादला बळी पडलेल्या प्रत्येक मुलीचे आयुष्य नरकासमान झालेले आहे. ‘केरला स्टोरी’ चित्रपट प्रसिद्ध होऊनही भारतात हिंदु मुलींवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. साम्यवादी इकोसिस्टीम (यंत्रणा) ‘हिंदु धर्मात स्त्री सुरक्षित नाही’, असे खोटे नॅरेटिव्ह (कथानक) पसरवत आहेत. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षण देत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान करण्यात आला, तसेच वेंगुर्ला नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप आणि उपनगराध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर यांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘बेटी बचाव राष्ट्र बचाव’ अभियानाला प्रारंभ !
कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाव राष्ट्र बचाव’ अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही या अभियानाचा प्रारंभ आपण करत आहोत. आपण सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा आणि राष्ट्र अन् धर्म विरोधी प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी केले. या वेळी ‘बेटी बचाव राष्ट्र बचाव’ अभियानाच्या फलकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !