‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. यज्ञाच्या ठिकाणचे चैतन्य देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातही जाणवणे
‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहात असतांना मला पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवत होते. यज्ञाच्या ठिकाणचे चैतन्य मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातही जाणवत होते. तेथील वातावरण ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’प्रमाणे (‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला.) चैतन्यदायी वाटत होते.
२. ‘श्री राजमातंगीदेवीने प्रसन्न होऊन सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत’, असे जाणवणे
‘यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष श्री राजमातंगीदेवी तेथे सूक्ष्मातून उपस्थित आहे. यज्ञानंतर देवी प्रसन्न झाली आहे. श्री राजमातंगीदेवीने सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत’, असे मला जाणवत होते.
३. ‘पुरोहित मंत्रोच्चार करत असतांना त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

श्री राजमातंगी महायज्ञाच्या वेळी ‘पुरोहित मंत्रोच्चार करत असतांना त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘कलियुगात असे पुरोहित केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच मिळाले आहेत’, असे जाणवून मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.
४. पुरोहितांनी पूर्णाहुतीच्या वेळी देवीला वस्त्र अर्पण केल्यावर ‘प्रत्यक्ष देवीच्या अंगावरच वस्त्र पांघरले आहे’, असे मला जाणवले.
५. यज्ञाच्या वेळी संपूर्ण वातावरण शांत आणि चैतन्यदायी जाणवणे
सद्गुरु आणि संत यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी या महायज्ञाचे आयोजन परिपूर्ण केले होते. त्यामुळे यज्ञ चालू असतांना कोणताच गोंधळ किंवा अस्थिरता जाणवत नव्हती. संपूर्ण वातावरण शांत आणि चैतन्यदायी जाणवत होते.
६. ‘यज्ञ ‘ऑनलाईन’ पहात आहोत’, असे मला वाटत नव्हते, तर ‘प्रत्यक्षात यज्ञाच्या ठिकाणीच मी उपस्थित आहे’, असे मला जाणवत होते.
७. श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी माझा वैयक्तिक नामजप आतून आणि एका लयीत होत होता.
८. माझे मन शांत आणि स्थिर झाले होते.
९. यज्ञानंतर बराच वेळ माझे मन निर्विचार झाले होते.
१०. सनातनचे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
‘या घोर कलियुगातही मोठ्या प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण करणारा, श्री राजमातंगीदेवीची कृपा संपादन होणारा महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला’, त्याबद्दल माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.’
– वैद्या सुश्री माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१.६.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।