विनाशाकडे जाणारा धर्मविहीन हिंदु समाज !

फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून परतणारे हिंदू

१. धर्मविहीन हिंदु समाजाची कोट्यवधी गायींच्या हत्येकडे डोळेझाक

भारताची फाळणी झाल्यानंतर काही संत जवाहरलाल नेहरूंकडे गेले आणि त्यांना हात जोडून गोमांस बंदी करण्याचे आवाहन केले. त्या वेळी नेहरू संतांचा अपमान करून त्यांच्या खोलीत निघून गेले. नंतर काही वर्षांनी गोहत्या बंदीसाठी धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांनी काढलेल्या मोर्चावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळ्या चालवल्या. त्यात शेकडो साधूंची हत्या झाली. सध्या भारतात प्रतिदिन न्यूनतम शेकडो गोवंशियांची हत्या होते; पण एकही हिंदु त्याविरुद्ध आवाज उठवत नाही. हिंदू हत्या होत असतांनाही गप्प आहे; कारण हिंदु समाज धर्मविहीन झाला असून त्यांना हिंदु असल्याचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे नेते पुन्हा एकदा भारताची फाळणी करण्याच्या घोषणा करत आहेत.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

२. भारत पुन्हा एका फाळणीच्या उंबरठ्यावर

त्या वेळी तेथे १ सहस्र ४०० कोटी रुपयांची मालमत्ता सोडून हिंदू भारतात आले. या देशाची जर धर्माच्या आधारावर फाळणी झाली होती, तर ती समान व्हायला हवी होती. येथून ७० लाख मुसलमान गेले आणि ३ कोटी भारतात राहिले. ते आजही आपल्या डोक्यावर २० ते २२ कोटी होऊन बसले आहेत. भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करणे, हे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे हिंदूंनी सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारताचे तुकडे करून त्यांना वेगळा पाकिस्तान दिला; पण ती प्रक्रिया संपली नसून अजूनही चालूच आहे. फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या, तेव्हा काही ठिकाणी धर्मांधांची लोकसंख्या १० ते २० टक्के होती, तरीही हिंदू स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आज किमान १३-१४ पाकिस्तान सिद्ध होऊ शकतात एवढी त्यांची शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे हिंदू त्यांचे रक्षण कसे करणार आहेत ?

दंगली तेव्हाही होत होत्या आणि आजही होत आहेत. प्रत्येक दंगलीच्या पूर्वी ते नमाजपठण करतात, एका मासाचा शिधा (रेशन) गोळा करून ठेवतात. पेट्रोलचे ‘कूपन्स’, पेट्रोलचे कॅन (छोटे पिंप), विटा, दगड, गोफण (दगड मारण्याची कमान) आजही त्यांची गच्ची, मशीद, त्यांच्या शाळा, घरे या ठिकाणी साठवलेली पहायला मिळतात. त्यामुळे एका क्षणात ते हिंदूंवर आक्रमण करतात. स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर ज्याप्रमाणे १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी संघर्ष केला होता, तसा संघर्ष आताही करावा लागणार आहे.

मीनाक्षी शरण यांचा परिचय

मीनाक्षी शरण

‘देहली येथील मीनाक्षी शरण या ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापिका अध्यक्षा आहेत. त्या संस्कृती आणि इतिहास यांच्या संशोधक आहेत. अनेक वर्षांमध्ये नरसंहार झालेल्या कोट्यवधी हिंदूंसाठी त्या ‘सर्वपित्री अमावास्या’ या तिथीला सामूहिक तर्पणाचे आयोजन करतात आणि त्यांना सद्गती मिळावी, यासाठी प्रयत्न करतात.

३. हिंदु युवकांची धर्माविषयी उदासीनता

फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून परतणारे हिंदू

या सर्व आघातांविषयी आपल्या युवा पिढीला काहीही देणे-घेणे नाही. याचे कारण त्यांना धर्मबोध नाही. त्यांना हिंदु पूर्वजांनी १ सहस्र ४०० वर्षे केलेला संघर्ष आणि विरोध यांची माहिती नाही. आपल्या युवकांची ही स्थिती आहे. वर्ष १९९० मध्ये (काश्मीरमध्ये) काय घडले, हेही आजच्या पिढीला ठाऊक नाही. वर्ष १९४७ मधील फाळणीचा नरसंहार त्यांना ठाऊक असणे शक्यच नाही; कारण त्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये सत्य इतिहास शिकवलाच गेला नाही. असे असले, तरी आपल्याला त्यांना खरा इतिहास शिकवावा लागणार आहे. जोपर्यंत त्यांना सत्य इतिहासाचे ज्ञान होणार नाही, तोपर्यंत त्यांना शत्रूबोध होणार नाही. आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या निर्भय बनवावे लागेल. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांना धर्मबोध करून द्यावा लागेल.

– मीनाक्षी शरण, संस्थापिका अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.

फाळणीच्या वेळी पाकमधील लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या

माझ्या दोन्ही आत्यांना १५ वर्षे आणि १९ वर्षे या वयात विहिरीत उडी मारून जीव द्यावा लागला !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. त्या फाळणीच्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. माझे सासर आणि माहेर ही दोन्ही कुटुंबे पाकिस्तानातील आहेत. ‘२ सहस्र कुटुंबांचे गाव आहे. तेथे २ ते ५ सहस्र लोकांचा समुदाय आक्रमण करतो. त्यांना घर सोडून जाण्यासाठी केवळ १० ते २० मिनिटांचा अवधी दिला जातो. काही जण विरोध करतात; पण ते घरातून बाहेर पडताच त्यांना लगेच मारून टाकले जाते. सर्वत्र मृतदेह विखुरलेले असतात. त्यांचे अंतिम संस्कारही झालेले नसतात’, हे प्रत्यक्षात घडलेले आहे. ही स्थिती आमच्या पूर्वजांची झाली होती. असे एकही कुटुंब नाही, जे पाकिस्तानातून सुखरूप आले. माझे आजोबा (वडिलांचे वडील) जमीनदार होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब ऐश्‍वर्यसंपन्न होते, तरी ते वाचू शकले नाहीत. माझे दुसरे आजोबा (आईचे वडील) ‘स्टेशन मास्तर’ (रेल्वेस्थानक प्रमुख) होते; पण तेही त्यांच्या कुटुंबाला वाचवू शकले नाहीत.

धर्मांधांनी केलेल्या नरसंहारामध्ये आमची काही कुटुंबे संपली. माझ्या दोन्ही आत्यांना १५ वर्षे आणि १९ वर्षे या वयात विहिरीत उडी मारून जीव द्यावा लागला. माझ्या मोठ्या काकांना स्वतःच्या आईसह स्वतःच्या हातांनी कुटुंबातील २३ जणांना कापून मारून टाकावे लागले. माझ्या आजोबांनी स्वतःला गोळी मारून घेतली. माझी मावशी रेल्वेतून येत असतांना धर्मांधांनी त्यांच्या कुटुंबाला कापून टाकले. यांसारख्या अनेक दुःखद गोष्टी घडल्या आहेत. अशा दुष्प्रवृत्तींचा सामना करण्यास आम्ही आजही शिकलो नाही. त्यामुळे आपल्याकडे मोठा बंगला आहे, त्याला मोठ्या संरक्षक भिंती आहेत, चारचाकी गाड्या आहेत, पहारेकरी आहेत; म्हणून आपले रक्षण होईल, या भ्रमात कुणी राहू नये’.

– मीनाक्षी शरण