कंत्राटदाराला धमकावून २ कोटी ५७ लाख रुपये उकळल्याचे प्रकरण

मंगळुरू (कर्नाटक) – एका कंत्राटदाराला त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन २ कोटी ५७ लाख रुपये उकळल्याच्या आरोपावरून दक्षिण कन्नड जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निझाम उपाख्य इब्राहिम याच्यासह दोघांना उरवा पोलिसांनी नुकतीच अटक केली.
Exposed: Congress Leader Arrested for ₹2.57 Crore Extortion!
Mangaluru, Dakshina Kannada: The mask has slipped again. Nizam (alias Ibrahim), a Youth Congress leader has been arrested for threatening a contractor and extorting a massive ₹2.77 crore.
This arrest raises a… pic.twitter.com/p3gRNn1dvR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
१. पोलिसांच्या माहितीनुसार कंत्राटदारासोबत काम करणार्या जितेशने त्यांचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे गुपचूप चित्रीत केले होती. हे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता.
२. त्यानंतर कंत्राटदाराने साहाय्यासाठी काँग्रेसचे नेते निझामकडे संपर्क साधला. निझामने त्यांना साहाय्य करण्याऐवजी जितेशशी हातमिळवणी केली आणि पैशांसाठी धमकावण्यास चालू केले.
३. ‘जितेशने आत्महत्या केली आहे, त्याच्या ‘सुसाईड नोट’मध्ये तुमचे नाव आहे आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल’, अशी भीती घालून निझामने कंत्राटदाराकडून पैसे उकळले. दोघांनी मिळून अनुमाने २ कोटी ५७ लाख रुपये उकळल्याचे पोलिसांनी सांगितले.
४. काही दिवसांपूर्वी जितेश शहरात असल्याचे कंत्राटदाराच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उरवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
५. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
६. हे प्रकरण उघडकीस येताच निझाम याची युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
७. या प्रकरणात आणखी काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा हात आहे का, याचा शोध घेण्यासाठी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या दक्षिण कन्नड जिल्हा शाखेने केली आहे.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले