
नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे, अशी प्रतिक्रिया भारताने त्या प्रांतात चालू असलेल्या हिंसाचाराविषयी व्यक्त केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेली निदर्शने आणि पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी केलेली कठोर कारवाई यांविषयी पाकिस्तान खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोपही भारताने केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या हिंसचारामध्ये आतापर्यंत १२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan’s Atrocities On POK: India Exposes Pak Hypocrisy! ⚠️
🇵🇰 Pak is spreading fake news & videos to cover up its own failures & horrific human rights violations in POK.
Meanwhile, international human rights bodies that love to target India are maintaining a deafening… pic.twitter.com/2FBUeygZq8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले,
१. पाकव्याप्त काश्मीरमधील प्रकरणाविषयी पाकिस्तानकडून खोट्या बातम्या आणि व्हिडिओ पसरवण्याचा प्रकार दिसून येत आहे. हा स्वतःचे अपयश लपवण्याचा आणि मानवी अधिकारांच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.
२. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तेथील पोलीस अमानवी पद्धतीने वागत असल्याच्या बातम्या येत आहेत. तेथे झालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्यूमुखी पडले असून काही जण घायाळही झाले आहेत.
३. आम्हाला आशा आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला त्याच्या चुकीच्या कृत्यांसाठी आणि मानवी अधिकारांच्या उल्लंघनासाठी उत्तरदायी ठरवेल.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार चालूच !
स्थानिक प्रशासन आणि पाकिस्तान सरकारची अन्याय्य धोरणे, यांविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक रस्त्यावर उतरले असून ते तेथे मोठ्या प्रमाणावर; पण शांततेत आंदोलन करत आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी या आंदोलकांना आमानुष मारहाण केली, तसेच आंदोलकांवर गोळीबार केला. यासह आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडन नंतर लाठीमारही केला. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी सैन्यावर दगडफेक केली. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी ‘ही पाकिस्तानची दडपशाही आहे’, असा आरोप केला.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन