आर्यभट्ट यांना ‘डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दाखवले !
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
मुंबई – जगाला ‘शून्या’ची देणगी देणारे महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाने त्याच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी अवमान केला आहे. आर्यभट्ट यांना ‘डिलिव्हरी बॉय’प्रमाणे (साहित्य वितरण करणार्याप्रमाणे) दाखवून त्यांचे महत्त्व अल्प करणे, त्यांच्या तोंडी विदुषकी सादरीकरणाचे संवाद दाखवणे आणि त्यांचा वापर ‘अमेझॉन’च्या व्यावसायिक स्वार्थासाठी करणे आदी चुकीच्या गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे देशप्रेमी आणि इतिहासप्रेमी संतप्त झाले आहेत. ‘या विज्ञापनामुळे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचा अपमान झाला असून ‘ॲमेझॉन’ने हे विज्ञापन त्वरित मागे घेऊन क्षमा मागावी, यासह केंद्र सरकारने यावर त्वरित कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)
🚨 INSULT To ARYABHATA IN AMAZON INDIA Advertisement! 🚨
The great Indian mathematician and astronomer Aryabhata, whose contributions transformed the fields of mathematics and astronomy, has been depicted as a "delivery boy" in an @amazonIN advertisement.
This comes amid… pic.twitter.com/YzpK1kkRIW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
१. विज्ञापनात आर्यभट्ट यांना आजच्या आधुनिक युगात परत आलेले दाखवण्यात आले आहे. काही मुले त्यांना ‘कोण आहेस तू ?’ आणि ‘चाचा, कोणते साहित्य आणले आहेस ?’ असे विचारून त्यांची थट्टा उडवत आहेत.
२. आर्यभट्ट हे मानवाच्या दृष्टीने ‘शून्या’चे महत्त्व कसे आहे, हे पहाण्यासाठी अत्यंत व्याकुळ झाल्याचे दाखवले आहे; मात्र या महान शोधाचा संबंध ॲमेझॉनने त्यांच्या ‘झिरो डिलिव्हरी फी’ (शून्य वितरण शुल्क), ‘झिरो सर्च फी’ (शून्य शोध शुल्क) आणि ‘झीरो हँडलिंग फी’ (शून्य हाताळणी शुल्क) यांच्याशी जोडला आहे; पण ते अत्यंत निषेधार्ह आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !