स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो का ?’, यावर माझा प्रश्न आहे की, तुम्ही तो घेण्यास सिद्ध आहात का ? तुम्हाला तो खरोखरच हवा आहे का ? तुम्हाला जर खरोखर हवा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही यथोचित प्रयत्न कराल, तर तो प्रत्यक्षानुभव तुम्हालाही प्राप्त होईल. तसे होईल, तेव्हाच तुम्ही खरेखुरे धार्मिक बनाल. जोपर्यंत तुम्हाला असा अपरोक्षानुभव लाभत नाही, तोपर्यंत तुमच्यात आणि नास्तिकात काहीही भेद नाही. भेद असेल, तर तो एवढाच की, नास्तिक निदान प्रामाणिक असतो; परंतु जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच