एका मुसलमान विद्यार्थ्याच्या आईला अटक

गौहत्ती (आसाम) – आसामच्या गोलपाडा जिल्ह्यातील एका शाळेत ९ वी इयत्तेचे ५ मुसलमान विद्यार्थी गोमांस घेऊन आले आणि त्यांनी २ हिंदु विद्यार्थ्यांना ते मांस बलपूर्वक खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ही घटना कृष्णई येथील हाबराघाट उच्च माध्यमिक शाळेत घडली. पोलिसांनी एका विद्यार्थ्याची आई नूर साहिदा बेगम हिला अटक केली आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार येथे मुसलमानांची लोकसंख्या ५७ टक्के आणि हिंदूंची लोकसंख्या ३४ टक्के आहे.
🚨 Assam School Controversy: Hindu Students Allegedly Pressured to Eat Beef by Muslim Classmates
One Muslim student's mother has been arrested in connection with the incident.
Reports suggest the school administration initially tried to handle the matter internally and… pic.twitter.com/pNYXmlZR4L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
मुसलमान विद्यार्थ्यांनी चमच्यात गोमांसाचे तुकडे घेऊन ते हिंदु विद्यार्थ्यांच्या तोंडाजवळ नेऊन त्यांना बलपूर्वक भरवण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘ते काय आहे ?’, हे हिंदु विद्यार्थ्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी चमचा झटकून दिला आणि गोमांस भूमीवर पडले. विद्यार्थ्यांनी ते मांस पायाने तुडवले आणि तेथून निघून गेले.
शालेय प्रशासनाने मुलांना शांत रहाण्यास सांगितले
हिंदु विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याविषयी माहिती दिली, तेव्हा ही घटना समोर आली; मात्र शालेय प्रशासनाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला आणि पीडित विद्यार्थ्यांना ‘याविषयी कुणाशीही बोलू नका’, अशी सूचना केली. (धर्मांध मुसलमानांच्या संदर्भात अशा कचखाऊ भूमिकेमुळेच त्यांचा उद्दामपणा अधिकाधिक वाढतो ! – संपादक) पीडित विद्यार्थी घरी पोचले आणि त्यांनी कुटुंबियांना पूर्ण माहिती सांगितली, तेव्हा ही घटना सर्वांसमोर आली. यानंतर संतप्त पालक आणि स्थानिक लोक शाळेत पोचले अन् त्यांनी शालेय प्रशासनाकडे जाब विचारला.
शालेय प्रशासनाने सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले, त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेतले की, ते असे कृत्य पुन्हा करणार नाहीत आणि प्रकरण वाढू नये म्हणून पहिली चूक समजून त्यांना क्षमा करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांनी केवळ शाकाहारीच भोजन आणावे ! – जिल्हा आयुक्तांची सूचना
गोलपाडाचे जिल्हा आयुक्त प्रदीप तिमुंग आणि पोलीस अधीक्षक नबनीत महंता यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाळेला भेट दिली. जिल्हा आयुक्तांनी शाळांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शाकाहारी भोजन आणले पाहिजे, ज्यामध्ये अंडी समाविष्ट असू शकतात; परंतु इतर कोणतेही मांसाहारी पदार्थ आणू नयेत.
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !