बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट

मिरज – तालुक्यातील बेडग येथील विठ्ठलनगर परिसरातील रहिवासी संजय आवटी यांच्या घरी दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घरावरील पत्रे, संसारोपयोगी साहित्य, रोकड, दागिने, तसेच सायकली आणि शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. जीवितहानी झाली नसल्याने अनर्थ टळला. ग्राम महसूल अधिकारी आणि मिरज ग्रामीण पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रोकड, दागिन्यांसह अन्य साहित्य जळून आगीत अनुमाने ५ लाख रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले.