
रस्त्यावरील नमाजपठणासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी राज्यघटनेतील अनुच्छेद २५ चा संदर्भ देऊन ‘रस्त्यावर नमाजपठण करणे’, हे आमच्या धर्मस्वातंत्र्याचा भाग असल्याचा दावा करत आहेत; पण ‘बॅरिस्टर’ उपाधी लावणार्या ओवैसींना डोळे फाडून दाखवा की, त्याच अनुच्छेद २५ मध्ये जे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावर कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, नीतीमत्ता आणि इतरांचे मूलभूत हक्क यांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची मर्यादा घातलेली आहे.
कायदा-सुव्यवस्था ही जी धर्मस्वातंत्र्यावरील मर्यादा आहे, ती एखाद्या गोष्टीत नेहमीची असू शकते, तर काही विषयांमध्ये परिस्थितीजन्य असू शकते. जर प्रशासनाला वाटले की, एखाद्या वेळी मोठ्या संख्येने लोक एकत्रित जमल्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, तर प्रशासन अशा एकत्रिकरणाला अनुमती नाकारू शकते. त्यामुळे नमाजपठण करणे जरी धर्मस्वातंत्र्य असले, तरी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमल्यामुळे कायदा -सुव्यव्यस्था बिघडू नये म्हणून त्या धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. (३१.५.२०२६)
– श्री. भरत आमदापुरे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, पुणे.
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री