महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राजापूर येथे तहसीलदारांना निवेदन

राजापूर – महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा कायदा केवळ भूमीविषयक प्रशासकीय प्रश्न नसून तो हिंदूंच्या देवस्थानांचे अस्तित्व, धार्मिक स्वातंत्र्य, मंदिरांची आर्थिक स्वायत्तता, परंपरा, श्रद्धा, तसेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी निगडित अत्यंत गंभीर विषय आहे.
हा कायदा देवस्थानांच्या मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा असून तालुक्यातील मंदिरांचा या प्रस्तावित कायद्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे ‘प्रस्तावित कायदा शासनाने मागे घ्यावा’, अशी मागणी मंदिरांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला केली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या वतीने राजापूरचे तहसीलदार विकास गमरे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले.
तहसीलदार विकास गमरे यांना निवेदन देते वेळी राजापूर शहरातील श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त संदीप मालपेकर, व्यापारी सौरभ पाटणकर, श्री कामादेवी मंदिराचे देवेंद्र शेट्ये, नागेश शेट्ये, हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर उपस्थित होते.
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही