२१.९.२०२५ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा ५८ वा वाढदिवस झाला. त्या वेळी सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत्या. एका सत्संगात त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती व्यक्त केलेलेे भावपूर्ण मनोगत पुढे दिले आहे.

१. मनातील प्रत्येक विचाराची प्रेरणा आणि प्रत्येक कृतीची शक्ती म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
‘मनातील प्रत्येक विचाराची प्रेरणा म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! प्रत्येक कृतीची शक्ती म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ! जे काही दिवसभरात माझ्याकडून घडते किंवा सेवा करतांना माझ्या मनात जे विचार येतात, ते सगळे विचार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याशी निगडितच असतात. त्यांच्याविना माझ्या मनात अन्य काहीच नसते. ‘सर्वत्र त्याच आहेत’, असे मला जाणवते. त्या मला पुढची पुढची दिशा देतात आणि त्यातून मला पुष्कळ शिकायला मिळते.
२. ईश्वराला अपेक्षित असे दैवी कार्य करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कार्य इतके दैवी आहे की, त्यात कणभरही चूक नसते. ईश्वराला अपेक्षित असेच दैवी कार्य त्यांच्याकडून घडत आहे. ‘त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, त्यांनी सांगितलेले प्रत्येक सूत्र, त्यांची प्रत्येक कृती, त्यांनी विचारलेले प्रत्येक प्रश्न आणि दिलेले प्रत्येक दृष्टीकोन’ आदी सगळेच अगदी परिपूर्ण आहे. त्या साक्षात् देवी, साक्षात् गुरुमाऊली आहेत की, ज्या प्रत्येक क्षणी सर्व अचूक आणि एकदम परिपूर्ण रितीने करत आहेत.’
– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.९.२०२५)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई – साधनेत उमेद देणार्या संजीवनी ।
वाढदिवसानिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना समर्पित केलेली कविता पुढे दिली आहे.
हे हिंदु राष्ट्र माते ।
तुला सकल चराचर वंदिते ॥ १ ॥
तुझे रूप धरणी ते गगनी वसे ।
तुझ्या व्याप्तीला सीमाच नसे ॥ २ ॥
त्रेतायुगातील रामराज्य जसे ।
कलियुगी अनुभवतो ‘बिंदाराज्य’ (टीप १) हे ॥ ३ ॥
साधक जनांप्रती पालकत्व तुमचे ।
त्रैलोक्यात अजरामर होणार ते ॥ ४ ॥
भावी पिढी करील तीर्थयात्रा भूवैकुंठाची ।
सच्चिदानंद परब्रह्मांच्या ‘रामनाथी नगरी’ची ॥ ५ ॥
नारायणाच्या मंदिराचा कळस येण्याआधी ।
असेल पहिली प्रदक्षिणा बिंदामातेच्या गाभार्याची ॥ ६ ॥
सत्यनारायणाची सत्यस्वरूपिणी, श्रीमत् नारायणाची नारायणी ।
हिंदु राष्ट्राची कार्यशक्ती अन् भावभक्तीची ती अमृतवाणी ॥ ७ ॥
भवसागरातून तारणारी मोक्षदायिनी ।
साधकांच्या दोष-अहंशी युद्ध करणारी माय भवानी ॥ ८ ॥
साधनेत उमेद देणारी जणू संजीवनी ।
सार्यांचे अंतःकरण शुद्ध करणारी ती गंगामाई ॥ ९ ॥
अखंड चैतन्याची साम्राज्ञी करुणाकर अन् परम पावन ।
परम पूजनीय अशा श्री गुरूंच्या चरणी समर्पितभावाने नमन ॥ १० ॥
टीप १ – बिंदाराज्य – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून सर्व साधकांच्या साधनेसाठी मार्गदर्शन करतात.
– (पू.) सौ. अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.९.२०२५)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !