
जीवनात आनंदी रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे आहेच; पण आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे आहे. साधना गांभीर्याने, तळमळीने, नित्यनेमाने, भावपूर्ण आणि काळानुसार योग्य केली, तरच आपल्यावर ईश्वर किंवा गुरु यांची कृपा लवकर होते. आपत्काळात ईश्वराने आपला हात धरावा, यासाठी आतापासूनच ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करणे वाढवावे. ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित होण्याच्या दृष्टीने पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी मनाची सिद्धता करावी. स्वतःच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी चांगली बसवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !)
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !