
श्रीमद्भगवद्गीता ‘तामस कर्ता’ सांगत असता ‘नैष्कृतिक’ असा शब्द वापरते. धर्माच्या नावाखाली दुसर्याला लुबाडून स्वत:चा स्वार्थ साधतो तो ! ख्रिस्ती मिशनरी, बुवा, दांभिक महंत या गटात येतात. पुष्कळशा कामगार पुढार्यांना लागू पडणारे आहे. ते कामगारहिताची घोषणा करून दीर्घकालीन संप पुकारतात, त्यात कामगारांची हानी होते. एक धनाच्या बळावर उद्योग उभारून श्रमिकांचे शोषण करतो, तर दुसरा श्रमिकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव देऊन संघटित करून संघर्ष उभारतो आणि स्वत:ची प्रतिष्ठा अन् स्वार्थ साधून घेतो. म्हणून भारतीय संस्कृतीने धनसत्ता आणि श्रमसत्ता या दोहोंमधून जीवनाची वाटचाल शोधिली आहे. भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथातून)
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?