CBSE Three Language Rule : सी.बी.एस्.ई.च्या त्रिभाषा नियमाच्या अंमलबजावणीची चौकशी होईल ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने सी.बी.एस्.ई.च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) ९ वीच्या वर्गात त्रिभाषा नियमावर सुनावणी करतांना म्हटले की, या नियम लागू करण्याच्या निर्णयाची चौकशी केली जाईल. या नियमामुळे विद्यार्थी आणि संसाधन यांवर अनावश्यक दबाव तर येत नाही ना, हे पहावे लागेल. एकीकडे शिक्षक आणि पुस्तके या दोन्हींची कमतरता असतांना दुसरीकडे हे धोरण लागू करण्यात येणार्‍या प्रत्यक्ष आणि व्यवस्थापकीय अडचणी समजून घ्याव्या लागतील.

न्यायालयाने केंद्र सरकार, सी.बी.एस्.ई. आणि एन्.सी.ई.आर्.टी. (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.