‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. यज्ञकुंडाचे बांधकाम करण्याच्या संदर्भात सेवेत आलेले अडथळे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा’ यांविषयी पुढे दिले आहे.

१. यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवेला आरंभ करणे

१ अ. यज्ञकुंडाचे बांधकाम करण्यासाठी गवंडी मिळण्यासाठी प्रार्थना केल्यावर ‘श्री मुंबादेवी आणि श्री राजमातंगीदेवी यांनी सूक्ष्मातून ‘तू गवंडी शोध, तुला गवंडी मिळतील’, असे सांगणे अन् त्यांचे बोलणे ऐकून भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : ‘यज्ञकुंडाचे बांधकाम करण्यासाठी साधक गवंडी आणि कामगार हवे आहेत’, असा मला निरोप मिळाला. मी प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्री मुंबादेवी आणि श्री राजमातंगीदेवी यांना भावपूर्ण प्रार्थना केली, ‘यज्ञकुंडाचे बांधकाम करण्यासाठी साधक गवंडी किंवा बाहेरील गवंडी मिळू दे.’ त्या वेळी मला श्री राजमातंगीदेवीचे अस्तित्व जाणवले. ‘माझ्या शरिरात पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जात आहे अन् आज्ञाचक्रावर लाल प्रकाश आहे’, असे मला जाणवले. तेव्हा श्री मुंबादेवी आणि श्री राजमातंगीदेवी यांनी मला सूक्ष्मातून सांगितले, ‘तू गवंडी शोध. तुला गवंडी मिळतील. काळजी करू नको. सर्वकाही चांगले होईल.’ तेव्हा माझा भाव जागृत झाला. माझी श्री राजमातंगीदेवीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुमाऊली आणि देवीच सर्वकाही करून घेणार आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. गवंड्याला यज्ञवेदीचे छायाचित्र दाखवून यज्ञाचे महत्त्व सांगणे आणि त्यांनी यापूर्वी यज्ञकुंडाचे बांधकाम केलेले नसूनही ते बांधकाम करायला सिद्ध होणे अन् देवाने त्यांना ही सेवा देण्याविषयी सांगणे : पनवेल येथे साधक गवंडी मिळाले नाहीत. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या मागे मैदानावर एक बांधकाम चालू आहे. मी तेथे जाऊन ते बांधकाम करणार्या ठेकेदारांना (कॉन्ट्रॅक्टरांना) यज्ञकुंडाचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ते बांधकाम करायला सिद्ध झाले. त्यांच्याकडे चांगले गवंडी होते आणि त्यांचे कामही चांगले होते. त्यांच्या गवंड्याला यज्ञवेदीचे छायाचित्र दाखवून त्याला यज्ञाचे महत्त्व सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही आतापर्यंत यज्ञकुंड बांधलेले नाही; पण आम्ही हे काम करू शकतो.’’ मला आतूनच उत्तर मिळाले, ‘या गवंड्यांना सेवा दे. ते करतील.’ त्यानुसार मी उत्तरदायी साधकांना सांगितले.
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या २ दिवस आधीपासूनच प्रार्थना होणे आणि श्री राजमातंगीदेवीचे रूप दिसून तिच्याकडून शक्ती अन् चैतन्य मिळणे
१७.५.२०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या २ दिवस आधीपासूनच माझ्याकडून श्री राजमातंगीदेवीला ‘या यज्ञाचा लाभ साधकांना होऊ दे. रामराज्याची लवकर स्थापना होऊ दे. युद्धजन्य परिस्थितीत भारताचे रक्षण होऊ दे. यज्ञ निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी प्रार्थना होत होती. या वेळी मला श्री राजमातंगीदेवीचे रूप दिसत होते. त्या वेळी मला शक्ती आणि चैतन्य मिळत होते अन् शांती अनुभवायला येत होती.
२. ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१७.५.२०२६ या दिवशी मी दुपारी ३ ते ७.३० या कालावधीत महायज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होतो.
अ. तेव्हा माझे मन एकाग्र झाले.
आ. माझे ध्यान लागल्यासारखे झाले.
इ. मला माझ्या आज्ञाचक्रावर लाल प्रकाश दिसून माझ्या शरिरात शक्ती आणि चैतन्य जात होते.
ई. मला थंडावा जाणवत होता.
उ. मला श्री राजमातंगीदेवीचे रूप दिसत होते.
ऊ. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
ए. माझ्याकडून देवीच्या चरणी ‘ज्या ज्या ठिकाणी आश्रमाचे बांधकाम आणि नूतनीकरण चालू आहे, त्या सेवा लवकर पूर्ण होऊ देत. बांधकाम सेवेतून आमची साधना होऊ दे. आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. ‘हे सर्वकाही गुरुदेवच करून घेत आहेत’, असे मला जाणवत होते.
ऐ. महायज्ञाच्या ठिकाणी मला शिव आणि पार्वती यांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी थंड लहरी माझ्या शरिरात जात होत्या.
ओ. ‘पुढे येणार्या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी गुरुमाऊलींनी यज्ञाच्या माध्यमातून सर्व साधकांना शक्ती दिली’, असे मला जाणवले.’
– श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२६)
२. यज्ञकुंडाचे बांधकाम करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !
२ अ. यज्ञकुंडाची जागा पहाण्यासाठी जाणे आणि यज्ञवेदीची मापे अन् त्याचे छायाचित्र ठेकेदारांना दाखवणे : ९.५.२०२५ या दिवशी ठेकेदार (कॉन्ट्रॅक्टर) श्री. धनंजय चव्हाण यांना समवेत घेऊन पनवेल येथून प्रभादेवी (मुंबई) येथे यज्ञकुंडाची जागा पहाण्यासाठी गेलो. त्या वेळी श्री. श्रेयस पिसोळकर यांनी आम्हाला ‘यज्ञकुंडाचा आकार आणि मापे’ यांविषयी समजावून सांगितले. यज्ञवेदीची मापे आणि त्यांचे छायाचित्र ठेकेदारांना (कॉन्टॅ्रक्टरांना) दाखवले. श्री. श्रेयस पिसोळकर यांच्या समवेत प्रभादेवी येथे रेती, सिमेंट आणि विटा बघून आलो. ११ आणि १२.५.२०२५ या कालावधीत यज्ञकुंडाचे बांधकाम करण्याचे ठरवले.
२ आ. ‘यज्ञकुंडांचे बांधकाम रात्रीच पूर्ण करायचे आहे’, असा निरोप मिळाल्यावर पनवेल येथील ठेकेदारांनी नकार देणे आणि शोधाशोध केल्यावर मुंबई येथील एक गवंडी बांधकाम करायला सिद्ध होणे अन् रात्री ८ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बांधकाम करणे : ११.५.२०२५ या दिवशी भूमीपासून बांधण्यात येणार्या यज्ञकुंडाचा काही भाग व्यासपिठाच्या वरच्या भागावर येणार होता. तेव्हा व्यासपिठाचे काम झाले नव्हते. त्यामुळे १२.५.२०२५ या दिवशी काही बांधकाम करता आले नाही. त्याच दिवशी दुपारी श्री. श्रेयस यांचा निरोप आला, ‘आपल्याला रात्रीच यज्ञकुंडाचे बांधकाम पूर्ण करायचे आहे.’ तेव्हा मी ठेकेदारांना विचारले, ‘‘पनवेल येथील गवंडी येतील का ?’’ तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर मुंबई येथील गवंडी मिळण्यासाठी शोधाशोध केली आणि एक गवंडी बांधकाम करायला सिद्ध झाला. त्या गवंड्याने रात्री ८ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बांधकाम केले. एका प्रसंगावरून गवंडी घाबरला आणि ‘‘काम सोडून जातो’’, असे म्हणाला. आम्ही त्याला यज्ञाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा सेवा चालू केली. आम्ही प्रार्थना करत होतो आणि कृतज्ञता व्यक्त करत होतो.
२ इ. व्यासपिठाची उंची वाढल्यामुळे यज्ञकुंडावर विटांचे २ थर वाढवावे लागणे आणि त्या काळात वाईट शक्तींनी केलेले आक्रमण : १३.५.२०२५ या दिवशी यज्ञकुंडाच्या बाजूने असलेल्या व्यासपिठाची उंची ४ इंचांनी वाढली. व्यासपिठ बांधणारे फळी कापायला सिद्ध नव्हते. त्यांनी सांगितले, ‘‘यज्ञकुंडांची उंची वाढवणे सोपे होईल.’’ त्यामुळे यज्ञकुंडावर विटांचे २ थर वाढवावे लागले. सायंकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत हे बांधकाम करण्यात आले. या गवंड्यासमवेत असलेला कामगार निघून गेला आणि हा गवंडीही काही कारणास्तव ‘काम सोडून जातो’, असे म्हणाला. आम्ही त्याला समजावून सांगितले. आम्ही त्याला ‘‘तुला साहाय्य करतो’’, असे सांगितल्यावर तो शांत झाला. गवंड्याला काही सुचेना. तो १५ ते २० मिनिटे बसून राहिला. ‘त्याच्यावरही वाईट शक्तींनी आक्रमण केले’, असे मला वाटले.
२ ई. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना घडलेला प्रसंग सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय करणे आणि साधक अन् गवंडी यांनी रात्री १ वाजेपर्यंत यज्ञकुंडाचे बांधकाम करणे : श्री. श्रेयस यांनी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना या प्रसंगाविषयी सांगितले. सद्गुरु अनुताईंनी नामजपादी उपाय केले. आम्ही ४ साधकांनी त्या गवंड्याला रेती आणि सिमेंट मिसळून देणे, विटा देणे, भराव करणे, असे साहाय्य केले. तेव्हा रात्री १ वाजेपर्यंत यज्ञकुंडाचे बांधकाम पूर्ण झाले.
२ उ. १४.५.२०२६ या दिवशी मी पनवेल येथून ठेकेदार आणि २ कामगार यांना यज्ञस्थळी घेऊन आलो. त्यांनी यज्ञकुंडाचे आतून आणि बाहेरून ‘प्लास्टर’ केले. त्यांच्या समवेत मुंबईचा एक गवंडीही साहाय्याला होता. सर्वांनी मिळून ही सेवा पूर्ण केली.
२ ऊ. यज्ञकुंड बांधून पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करतांना आलेल्या अनुभूती : आम्ही आणि कामगारांनीही श्री सिद्धिविनायक देवता, प.पू. गुरुमाऊली, श्री मुंबादेवी आणि श्री राजमातंगीदेवी यांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी मला माझ्या आज्ञाचक्रावर लाल प्रकाश दिसत होता. माझ्या शरिरात शक्ती आणि चैतन्य जात होते. मला यज्ञकुंडातही चैतन्य जाणवत होते.
३. धावपळ होऊनही कोणताही त्रास न होणे आणि उत्साह अन् आनंद अनुभवणे
मला २ दिवस जागरण झाले. मी ३ दिवस ‘पनवेल ते दादर’ असा रेल्वेने प्रवास केला. रेल्वेच्या डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. असे असूनही मला कसलाही त्रास झाला नाही. माझा उत्साह आणि आनंद टिकून होता. पनवेलचे ठेकेदार आणि कामगार हेही उत्साही अन् आनंदी होते.
‘प.पू. गुरुमाऊली, श्री सिद्धिविनायक देवता, श्री मुंबादेवी आणि श्री राजमातंगीदेवी यांच्या कृपेमुळे मला सेवेची संधी मिळाली. त्यांनीच ही सेवा माझ्याकडून करून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२६)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !