
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : संगीतात केवळ ७ स्वर आहेत. यांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ? (२२.७.२०१८)
श्री. राम होनप :
१. व्यक्तीच्या शरिरातील सप्तस्वरांचे स्थान

व्यक्तीच्या शरिरातील मूलाधारचक्राच्या स्थानी सूक्ष्म कमळ असते. ते कुंडलिनीशक्तीचे मूळ असल्याने त्याला ‘मूळ कमळ’, असे म्हटले आहे. त्या कमळाचे ‘लं’, हे बीजाक्षर आहे. त्या सूक्ष्म कमळाला ७ पाकळ्या आहेत. त्या ७ पाकळ्यांना ‘सप्तश्रुती’, असे म्हणतात.
१ अ. ‘सप्तश्रुती’, म्हणजे काय ? : ‘श्रुती’ याचा अर्थ ‘ऐकणे’, असा होतो. व्यक्तीच्या मूलाधारचक्रावर विराजमान असलेल्या ७ श्रुतींना सृष्टीतील भाव-भावना ऐकू येतात, म्हणजे ग्रहण करता येतात. त्या दैवी शक्तींना ‘श्रुती’, असे म्हटले आहे. या श्रुतींमुळे गायकाला सृष्टीतील विविध भाव-भावना ग्रहण होतात आणि त्या व्यक्त करता येतात.
१ अ १. ‘सप्तश्रुतीं’ची निर्मिती : व्यक्तीच्या शरिरात सप्तश्रुतींची निर्मिती भगवान शिवाने केलेली आहे. सप्तश्रुती या भगवान शिवाच्या उपशक्ती आहेत.
१ अ १ अ. ‘सप्तश्रुती’ आणि ‘सप्तस्वर’ यांचा परस्परांशी असलेला संबंध ! : सप्तश्रुतींची शक्ती आणि कार्य यांनुरूप एकेका दैवी शक्तीला अनुक्रमे ‘सा, रे, ग, म, प, ध, नी’, असे सात स्वरांचे संबोधन आहे.
२. व्यक्तीच्या शरिरात सात स्वर निर्माण होण्याची प्रक्रिया
ज्याप्रमाणे कमळाची एकेक पाकळी उमलते, त्याप्रमाणे मूलाधारचक्राशी संबंधित सूक्ष्म कमळाच्या पाकळ्या टप्प्याटप्प्याने उमलतात.
बाळ जन्माला आल्यानंतर १ – २ मासांनी त्याच्या मूलाधारचक्राची १ पाकळी उमलते, म्हणजे पहिली श्रृति ‘सा’ या स्वराची निर्मिती होते. त्यानंतर पुढील १ – २ मासांनी तेथे दुसरी पाकळी उमलते, म्हणजे दुसरी श्रुति ‘रे’ या स्वराची निर्मिती होते. अशा प्रकारे बाळ १ वर्षाचे झाल्यानंतर मूलाधारचक्रावरील सूक्ष्म कमळाच्या ७ पाकळ्या, म्हणजे सप्तस्वरांशी संबंधित शक्तींची निर्मिती होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळाला कंठ फुटतो आणि ते बोलू लागते.
३. ऋषींनी सप्तस्वरांद्वारे विविध राग निर्माण करण्याची प्रक्रिया !
काही ऋषींना ‘मूलाधारचक्रावरील सप्तश्रुती आणि त्यांच्याशी संबंधित सात स्वर’, यांचे ज्ञान झाले. त्यानंतर त्या ऋषींना ‘बाळात मूलाधारचक्राशी संबंधित सूक्ष्म कमळाद्वारे टप्प्याटप्प्याने एकेक सूक्ष्म पाकळी िनर्माण होते’, याचे ज्ञान झाले. यानुसार ऋषींनी सप्तस्वरांचा समूह आणि त्यांचा क्रम सिद्ध केला. त्यानंतर ऋषींनी ‘संगीताचे मूळ सप्तस्वरांमध्ये आहे’, हे निश्चित केले. त्यांना ‘स्वरसमूह’, असे म्हणतात. या स्वरांना गायनाचा गाभा मानून ऋषींनी विविध रागांची निर्मिती केली.
४. गायकाला केवळ सात स्वरांद्वारे विविध भाव-भावना व्यक्त करता येण्याचे आध्यात्मिक कारण
४ अ. सप्तस्वरांची वैशिष्ट्ये : सात स्वरांमध्ये पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांचे प्रमाण अन्य स्वरांच्या तुलनेत अधिक आहे. याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे
४ अ १. पृथ्वीतत्त्व : हे सृष्टीतील सर्व भाव-भावनांशी निगडित आहे.
४ अ २. आपतत्त्व : यामुळे स्वरांमध्ये लवचिकता येत असल्याने गायकाला गायनाद्वारे विविध भाव-भावना आणि चढ-उतार सहजतेने व्यक्त करता येतात.
४ अ ३. तेजतत्त्व : यामुळे स्वरांचा परिणाम गायक आणि श्रोते यांवर अधिक प्रमाणात होतो.
५. ऋषींच्या संगीतातील अद्वितीय कार्याचे वैशिष्ट्य
ऋषींना वरील ईश्वरी ज्ञान असल्यामुळे त्यांनी संगीतात सप्तस्वरांना प्रधान मानून विविध रागांची निर्मिती केली. त्यांद्वारे गायकाला विविध भाव-भावना सहजतेने व्यक्त करता येतात. त्यामुळे गायनात परिपूर्णता आली आहे.
६. श्री. राम होनप यांना वरील सूक्ष्मातील ज्ञान मिळतांनाची झालेली प्रक्रिया
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यासाठी वरील प्रश्न दिला. एरव्ही प्रश्न वाचल्यावर मला गुरुकृपेने काही सेकंदांतच त्या प्रश्नाची सूक्ष्मातील उत्तरे मिळतात; परंतु हा प्रश्न वाचल्यानंतर १० ते १५ मिनिटे मला सूक्ष्मातून काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला मार्ग दाखवा.’ त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या मूलाधारचक्रात आहे.’ त्यानंतर मला वरील ज्ञान सूक्ष्मातून सहजतेने प्राप्त झाले. त्या वेळी माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक, तबला-विशारद प्रथम), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ४.९.२०२५, वेळ : सकाळी १०.३१ आणि कालावधी : १५ सेकंद)
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !