रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. सुजाता अशोक रेणके यांना होणार्या पोटदुखीच्या त्रासावर उपाय म्हणून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेला नामजप केला. तो केल्यावर सौ. रेणके यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. साधिकेला तीव्र त्रास होत असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी तत्परतेने नामजपादी उपाय सांगणे आणि त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने साधिकेच्या त्रासांची तीव्रता न्यून होणे
१ अ. वास्तूशांत असतांना साधिकेला जुलाब आणि पोटदुखी यांचा तीव्र त्रास होणे अन् सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारणे : ‘वर्ष २०१८ मध्ये गोवा येथे आम्ही आमच्या घराची वास्तूशांत करायची ठरवले होते. आम्ही नातेवाइकांना बोलावले होते. त्याच कालावधीत मला जुलाब होऊन माझ्या पोटात दुखत होते. कार्यक्रम जवळ आला, तरीही माझा त्रास न्यून होत नव्हता. मला पुष्कळ काळजी वाटू लागली. माझ्यात बसण्याचीही शक्ती नव्हती. आमच्या घराच्या शेजारी सद्गुरु राजेंद्र शिंदे रहातात. मला असा त्रास होत असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. आम्ही त्यांना माझ्या त्रासाविषयी सांगितल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले.
१ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजपादी उपाय सांगणे आणि ‘वास्तूशांतीच्या आधीच पूर्ण बर्या होणार’, असे सांगून साधिकेला आश्वस्त करणे : सद्गुरु राजेंद्रदादांनी मला नामजपादी उपाय सांगितले. नंतर सद्गुरु दादा प्रत्येक घंट्याला माझी विचारपूस करत होते. ‘त्रास किती टक्के न्यून झाला ?’, असे मला विचारत होते. सद्गुरु दादांनी मला ‘‘तुम्ही वास्तूशांतीच्या आधीच पूर्ण बर्या होणार’, असे सांगितले. मी पूर्ण बरी होईपर्यंत सद्गुरु दादांनी माझ्याकडून विविध नामजपादी उपाय करून घेतले. मी नामजपादी उपाय केल्याने ८ दिवसांत संपूर्णपणे बरी झाले. वास्तूशांत होईपर्यंत मला कुठलाही त्रास झाला नाही. सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडला. तेव्हा माझी सद्गुरु राजेंद्रदादांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची अनुभवलेली प्रीती !

२ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी माझ्यासाठी नामजप केल्यावर २० ते २५ मिनिटांत पोटदुखी न्यून होणे : २१.३.२०२६ या दिवसापासून मला जुलाब होऊन माझ्या पोटात दुखत होते. २७.३.२०२६ या दिवशी माझ्या पोटात पुष्कळच दुखत होते. रात्री १० वाजता पोटदुखी सहन न झाल्यामुळे मी सद्गुरु राजेंद्रदादांच्या घरी गेले. सद्गुरु दादा त्या वेळी घरी होते. त्यांनी माझी स्थिती पाहून विलंब न करता माझ्यासाठी नामजप केला. तोपर्यंत सौ. मीनलताईंनी (सद्गुरु राजेंद्रदादांच्या पत्नी) माझ्या पोटाला हळूवारपणे तूप लावले. सौ. मीनलताईंनीही माझी पुष्कळ काळजी घेतली. सद्गुरु दादांनी नामजप केल्यानंतर २० ते २५ मिनिटांत माझी पोटदुखी न्यून झाली. त्यानंतर त्यांनी मला ‘महाशून्य’हा नामजप करायला सांगितला. सद्गुरु दादांनी माझे यजमान (श्री. अशोक रेणके) यांना सांगितले, ‘‘रात्री पुन्हा तुमच्या पत्नीला त्रास झाल्यास तुम्ही पत्नीसाठी ‘महाशून्य’ हा नामजप करा.’’
२ आ. साधिकेच्या यजमानांनी नामजप केल्यावर साधिकेचा त्रास दूर होणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संकल्पाची प्रचीती येणे : त्याच रात्री २ वाजता पुन्हा माझ्या पोटात प्रचंड दुखू लागले. श्री. रेणके यांनी सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे माझ्यासाठी नामजप केला. यापूर्वी श्री. रेणके यांनी माझ्यासाठी असे उपाय कधीच केले नव्हते. सद्गुरु दादांचा संकल्प झाला असल्याने यजमानांनी माझ्यासाठी नामजप केल्यावर मी १ घंट्यातच बरी झाले.
२ इ. ‘गुरुदेवच सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून काळजी घेत आहेत’, असे वाटणे : त्या वेळी संतांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. सद्गुरु दादांनी दुसर्या दिवशीही माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. ते मला घरी येऊन भेटले. ‘स्वतःला अनेक शारीरिक त्रास असूनही संत इतरांची कशी काळजी घेतात !’, हे मला अनुभवायला मिळाले. त्या वेळी ‘गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच) सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत’, असे मला वाटले. माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्दच नव्हते.
२ ई. साधिका वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जात असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी तिला भ्रमणभाष करून ‘महाशून्य’ हा नामजप तपासणी होईपर्यंत करायला सांगणे आणि साधिकेच्या काही वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल सर्वसाधारण येणे : २ दिवसांनी मला मडगाव येथील आधुनिक वैद्यांकडे तपासणी करण्यासाठी जायचे होते. आम्ही सद्गुरु दादांना भेटून ‘तपासण्या करण्यासाठी जात आहोत’, असे सांगितले. आम्ही गाडीत बसलो. नंतर ५ ते १० मिनिटांतच सद्गुरु दादांनी मला भ्रमणभाष करून डोळ्यांवर हात ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप तपासणी होईपर्यंत करायला सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तपासणी होईपर्यंत मी ‘महाशून्य’ हा नामजप केला. सद्गुरु दादांच्या कृपेमुळे माझ्या काही वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सर्वसाधारण (‘नॉर्मल’) आले. सद्गुरु दादांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांनी दिलेला नामजप केल्यामुळे अन् सतत गुरुदेवांचे स्मरण केल्याने मी मनाने आनंदी होते.
३. एका वैद्यकीय चाचणीत जंतूसंसर्ग झाला असल्याचे निदान होणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजप सांगणे
३ अ. साधिकेने तिला जंतूसंसर्ग (‘इन्फ्केशन’) झाला असूनही ‘विषबाधा झाली आहे’, असे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सांगणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजप न मिळणे : साधिकेला स्वतःला जंतूसंसर्ग (‘इन्फ्केशन’) झाला आहे’, असे समजले. ‘जंतूसंसर्ग म्हणजे विषबाधा असेल’, असे मी गृहीत धरले. मी सकाळी ८ वाजता सद्गुरु दादांना ‘मला विषबाधा या त्रासावर नामजपादी उपाय हवे आहेत’, असा भ्रमणभाषवर संदेश पाठवला. सद्गुरु दादा त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पनवेल येथे जाण्यासाठी निघणार होते. त्या घाईतही ते माझ्यासाठी विषबाधा या त्रासावर नामजपादी उपाय शोधू लागले. बराच वेळ झाला, तरीही त्यांना त्यावर नामजप मिळत नव्हता. त्यात त्यांचा पुष्कळ वेळ गेला. नंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही आश्रमातील पुरोहितांना विचारून त्यांच्याकडून मंत्र घेऊ शकता.’’
३ आ. नंतर माझ्या यजमानांनी सद्गुरु दादांना ‘माझ्या पत्नीला जंतूसंसर्ग झाला आहे’, असे सांगितले. तेव्हा सद्गुरु दादा पुन्हा नामजप आणि मुद्रा शोधू लागले. त्यांनी ५ मिनिटांतच नामजप आणि मुद्रा शोधून दिली. त्यानंतर ४५ मिनिटांनी माझ्या त्रासाची तीव्रता न्यून झाली.
३ इ. ‘संत किती अचूक उपाय शोधतात ! प.पू. गुरुदेवांनी संतांना किती परिपूर्ण शिकवले आहे !’, हेही मला शिकायला मिळाले.
३ ई. ‘माझ्या चुकीमुळे संतांचा अमूल्य वेळ वाया गेला’, याची मला पुष्कळ खंत वाटली. या चुकीसाठी मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची क्षमा मागितली.
४. गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा लाभत असलेला सत्संग !
सद्गुरु दादा म्हणजे निरपेक्ष प्रेमाची खाणच आहेत. आम्हाला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला सद्गुरु दादांचा सत्संग लाभत आहे. सद्गुरु दादा आमच्या घराच्या शेजारी रहात असल्याने मला योग्य वेळी त्यांच्याकडून नामजपादी उपाय मिळाले.
मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सुजाता अशोक रेणके (वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.४.२०२६)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !