‘१७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहात असतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. यज्ञामुळे वातावरण पुष्कळ चैतन्यदायी आणि भावपूर्ण होणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे संगणकीय प्रक्षेपण पहायला मिळाले. यज्ञवेदीची अत्यंत सुंदर मांडणी, श्री गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी केलेले सुंदर पौरोहित्य, शुद्ध आणि पवित्र स्वरातील श्लोकांचे मंत्रोच्चार इत्यादीमुळे वातावरण पुष्कळच चैतन्यदायी अन् भावपूर्ण झाले होते.
२. ‘द्वापर युगातील एका उच्च कोटीच्या ऋषींच्या आश्रमात होत असलेला महायज्ञ न्याहाळत आहे’, असे जाणवणे
यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाल्याने मला आनंददायी आणि शांत वाटत होते. ‘द्वापर युगातील एका उच्च कोटीच्या ऋषींच्या आश्रमात होत असलेला एक महायज्ञ मी न्याहाळत आहे. इतर ऋषीगण यज्ञवेदीच्या समीप बसून प्रसन्नतेने शुद्ध स्वरात मंत्रोच्चार करत आहुती देत आहेत’, असे मला जाणवले.
३. यज्ञातून बाहेर पडणार्या धुरामुळे माझे मन प्रसन्न झाले. माझे सर्वांग गदगदित झाले होते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या अनुभूती आल्या’, त्याबद्दल माझे दोन्ही कर त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने जोडले गेले.’
– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२६)

१. यज्ञस्थळी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्यांशांचे आगमन झाल्यावर
१ अ. वातावरणात थंडावा जाणवणे : ‘१७.५.२०२६ या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाच्या स्थळी दुपारी ३.१५ वाजता मुख्य आचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांच्या हस्ते आणि अन्य पुरोहितांच्या उपस्थितीत सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्यांशांचे वाजत-गाजत आगमन झाले. त्यांच्या मागून सद््गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, हे सर्व जण नमस्काराची मुद्रा करून चालत येत होते. ते दृश्य पडद्यावर पहात असतांना मला थंडावा जाणवत होता. (मी बसलेल्या खोलीत वातानुकूलन यंत्र चालू होते; पण हा थंडावा वेगळाच जाणवत होता.) नंतर माझ्या अंगावर शहारे येऊन मला थंडी वाजू लागली.

१ आ. ‘शिव आणि शक्ती, हे दोघेही पृथ्वीवर आले आहेत’, असे जाणवणे : ८.५.२०२६ या दिवशी देवाच्याच कृपेमुळे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्यांशांचे आगमन झाले. त्या वेळी ‘आम्हाला ते दिव्यांश जवळून पहाता आले’, त्याबद्दल आम्ही देवाचे ऋणी आहोत.
आता यज्ञाच्या वेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्यांश मुंबईला असतांना मला गोव्यातील रामनाथी आश्रमात त्यांची शक्ती जाणवू लागली. त्या वेळी घंटा, सनई आणि घट यांचा आवाज ऐकून ‘देवी शक्तीच्या रूपात धावून आली आहे’, असे मला जाणवत होते. यज्ञ चालू होण्यापूर्वीच देवीचे चैतन्य जाणवत होते. त्या वेळी ‘शिव आणि शक्ती, हे दोघेही पृथ्वीवर आले आहेत’, असे मला वाटत होते.
२. हा यज्ञ चालू होण्यापूर्वीच ‘यज्ञ पृथ्वीवर होणार नसून वेगळ्याच लोकात होणार आहे’, असे मला जाणवत होते.
३. यज्ञाचा संकल्प चालू असतांना
३ अ. यज्ञाचे मुख्य यजमान यज्ञाचा संकल्प करत असतांना
३ अ १. वातावरणात शक्ती जाणवत होती.
३ अ २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. संकल्प करत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्यावर तेज जाणवत होते.
आ. ‘त्या ध्यानात गेल्या आहेत’, असे मला जाणवले.
इ. त्या संकल्प करत असतांना ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.
ई. त्या करत असलेल्या प्रार्थनेत (संकल्पात) शक्ती जाणवत होती.
३ आ. सामूहिक संकल्प चालू असतांना
१. सामूहिक संकल्प करत असतांना माझा घसा पुष्कळ दुखत होता. त्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते. आम्ही साधक जसजशा संकल्पातील पुढच्या ओळी म्हणत होतो, तसतशी माझ्या मनाची स्थिती निर्विचार होत होती. माझे मन एकाग्र होत होते.
२. ‘त्या ठिकाणी देव आणि मी, असे दोघेच आहोत’, असे मला जाणवत होते.
३. नंतर मला माझ्या हृदयाच्या ठिकाणी थंड स्पंदने जाणवली.
४. पूर्णाहुतीच्या वेळी वातावरणात पिवळा लख्ख प्रकाश दिसणे पूर्णाहुतीच्या वेळी साधिका सौ. विद्या शानभाग यांनी मला बाहेरचे वातावरण पहाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी बाहेर पाहिले, तर पिवळा लख्ख प्रकाश दिसत होता. ‘जणू सूर्यच खाली आला आहे’, असे मला वाटत होते. त्यानंतर वारा सुटला.
५. यज्ञसमाप्तीनंतर
५ अ. गोव्यात विजा कडाडून पाऊस पडू लागणे, श्रीकृष्णजन्माच्या कथेची आठवण येणे आणि ‘श्री राजमातंगीदेवी विजेच्या रूपात गुरुदेवांना भेटण्यासाठी आली आहे’, असे जाणवणे : यज्ञसमाप्तीनंतर विजा कडाडत होत्या आणि पाऊस पडू लागला. त्या वेळी मला श्रीकृष्णजन्माची पुढील कथा आठवली, ‘श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवाने त्याला एका टोपलीत ठेवले आणि भर पावसात यमुना नदी पार करून त्याने श्रीकृष्णाला गोकुळात नंद अन् यशोदा यांच्या घरी पोचवले. त्या वेळी यशोदेने एका मुलीला (योगमायेला) जन्म दिला होता. वसुदेवाने त्या मुलीला टोपलीत ठेवून मथुरेला कारागृहात आणले. कंसाने त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात देवीच्या रूपात प्रगट होऊन म्हणाली, ‘तुला मारणार्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. तो गोकुळात वाढत आहे.’
ही कथा आठवल्यावर माझ्या लक्षात आले, ‘यज्ञ झाल्यानंतर कडाडणार्या विजा साध्या नाहीत. या विजांच्या रूपात साधकांना देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी देवी-देवता सूक्ष्म रूपाने रामनाथी आश्रमात येतात. त्याचप्रमाणे आज श्री राजमातंगीदेवी विजेच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना भेटण्यासाठी आली आहे.’
५ आ. ‘साधकांना पावसाच्या रूपातील वरुणदेवाचा आशीर्वाद गुरुदेवांच्या कृपेमुळेच मिळाला आहे’, असे मला जाणवले.’
– सुश्री प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२६)
१. महायज्ञ चालू होण्यापूर्वी उष्णतेचा त्रास होऊ लागल्याने तो दूर होण्यासाठी श्री राजमातंगीदेवीच्या चरणी प्रार्थना करणे
महायज्ञ चालू होण्याच्या ३० मिनिटे आधी माझ्या तळपायांतून उष्णता बाहेर पडत होती. तळपाय उष्ण झाल्याने मला काही सुचत नव्हते; म्हणून मी थंड पाणी प्यायले आणि थंड पाण्याने पायही धुतले, तरीही माझा त्रास न्यून झाला नाही. माझ्याकडून राजमतंगीदेवीच्या चरणी प्रार्थना झाली, ‘हे माते, मला यज्ञाचा आध्यात्मिक स्तरावर पूर्ण लाभ घेता येऊ दे. मला चैतन्य ग्रहण करता येऊ दे. तूच माझा हा त्रास दूर कर.’

१ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आगमनानंतर उष्णतेचा त्रास दूर होणे आणि ‘देवीनेच सद्गुरूंच्या माध्यमातून काळजी घेतली’, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे : त्यानंतर काही मिनिटांतच सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे) महायज्ञाच्या प्रक्षेपणाच्या ठिकाणी आले. ते तेथील आसंदीवर ५ मिनिटे डोळे मिटून बसले. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला जाणवले, ‘जणूकाही त्या भागातील वातावरणातील स्पंदनांचा ते अभ्यास करत आहेत. तेथील आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी, तसेच साधकांना महायज्ञाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी ते प्रार्थना करत आहेत.’ त्यानंतर सद्गुरु राजेंद्रदादा माझ्या मागे असलेल्या आसंदीवर ५ मिनिटे डोळे मिटून बसले. नंतर लगेचच दुपारी ३ वाजता महायज्ञाचे प्रक्षेपण चालू झाले आणि सद्गुरु दादा दुसर्या खोलीत यज्ञाचे प्रक्षेपण पहाण्यासाठी गेले.
त्यानंतर मी महायज्ञाचे प्रक्षेपण पाहू लागले. माझे मन एकाग्र होऊन निर्विचार झाले आणि मला पुष्कळ शांत वाटू लागले. थोड्या वेळाने ‘माझ्या तळपायांतून येणार्या उष्णतेच्या वाफा बंद झाल्या आहेत’, हे माझ्या लक्षात आले. ‘सद्गुरूंच्या आगमनाने वातावरणातील त्रास न्यून झाला. देवीने माझी प्रार्थना ऐकली. देवीनेच सद्गुरूंच्या माध्यमातून माझी काळजी घेतली’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्याकडून श्री राजमातंगीदेवी आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. यज्ञाच्या एका टप्प्यावर महिषासुरमर्दिनी स्तोत्र चालू झाले. ते म्हणतांना ‘आम्ही सर्व साधक तल्लीन झालो आहोत’, असे मला जाणवत होते आणि ‘स्तोत्र म्हणतच रहावे, तसेच देवीची स्तुती करतच रहावी’, असे मला वाटत होते.
‘हे गुरुमाऊली, तुम्हीच या अनुभूती माझ्याकडून लिहून घेतल्या. त्या तुमच्या चरणी अर्पण करून मी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, विहिघर, पनवेल. (२०.५.२०२६)
सनातन संस्थेचे कार्य वटवृक्षासारखे वाढले असल्याची साक्ष देणारा मुंबई येथे झालेला श्री राजमातंगी महायज्ञ !
१. समाजातील लोकांचे सनातन संस्थेविषयीचे गौरवोद्गार ऐकून अंगावर रोमांच येऊन भावजागृती होणे
‘श्री राजमातंगी महायज्ञाच्या दुसर्या दिवशी, म्हणजे १८.५.२०२६ या दिवशी माझी एका साधिकेशी भेट झाली. ती महायज्ञाला मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित होती. तिने सांगितले, ‘‘मुंबई येथील स्थानिक लोकांनी सांगितले, ‘‘ज्या नर्दुल्ला टँक मैदानात महायज्ञाचे आयोजन केले होते, त्या मैदानात कोणताही कार्यक्रम ठरला की, काहीतरी अडचणी येतात आणि आयोजित कार्यक्रम रहित होतात; मात्र श्री राजमातंगी यज्ञस्थळाची केवळ पूर्वसिद्धता पाहूनच ते लोक म्हणाले, ‘‘तुम्ही तर या जागेचा स्वर्ग केलात !’’ हे ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझा भाव जागृत होऊन माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. साधनेचे आरंभीचे दिवस आठवणे आणि सनातन संस्थेचे वाढलेले भव्य दिव्य कार्य पाहून भाव जागृत होणे
श्री राजमातंगी महायज्ञ पहात असतांना मला माझ्या साधनेचे आरंभीचे दिवस आठवले. पनवेलसारख्या लहान शहरात एका मंदिरात सनातनचा सत्संग होत असे. त्या सत्संगात मी उपस्थित रहायचे; मात्र आज या संस्थेने आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा महायज्ञाचे ४० हून अधिक देशांत प्रक्षेपण होत आहे आणि त्याला उपस्थित रहाण्याची संधी मलाही मिळत आहे. खरंच मी किती भाग्यवान आहे !
‘सनातन संस्थेचे कार्य आरंभी एखाद्या लहानशा वेलीप्रमाणे होते आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला अन् माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, विहिघर, पनवेल. (२०.५.२०२६)
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !