Gokul Milk Halal Certification : ‘गोकुळ’ दूध उत्पादन संघाच्या विविध उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र !

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ म्हणजेच ‘गोकुळ’च्या काही उत्पादनांनी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

या संदर्भात सामाजिक माध्यमांवर प्रमाणपत्राची एक प्रत प्रसारित झाली असून त्यात १९ मार्च २०२५ या दिवशी हे प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक दिसत आहे आणि हे १८ मार्च २०२८ पर्यंत ग्राह्य असल्याचा दिनांक दिसत आहे. या संदर्भात सर्वसामान्य हिंदु ग्राहक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गोकुळच्या उत्पादनांसाठी घेण्यात आलेले हे प्रमाणपत्र ! (चित्रावर क्लिक करा)

आखाती देशांत निर्यात करण्यासाठी प्रमाणपत्र ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘हे प्रमाणपत्र वर्ष २०२२ मध्येच घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेले ते एक तांत्रिक आणि गुणवत्ता मानक आहे.

गोकुळचे तूप, लोणी, दूध पावडर मोठ्या प्रमाणात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, तुर्कीये, जॉर्डन, सीरिया या आखाती देशांमध्ये विकले जाते. या देशांच्या व्यापार नियमानुसार ‘हलाल प्रमाणपत्र’ असल्याविना तिथे अन्नपदार्थ विक्रीस अनुमती मिळत नाही, त्यामुळे हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.’’ (आखाती देशांमध्ये विकण्यात येणारी हलाल प्रमाणित उत्पादने भारतात का विकली जात आहेत ? याचे उत्तर मुश्रीफ यांनी दिले पाहिजे ! – संपादक)

‘शुद्ध शाकाहारी असलेल्या दूग्धजन्य उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता काय ?’ असा प्रश्न सामाजिक माध्यमांवर विचारला जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ हे ‘गोकुळ’चे अध्यक्ष असतांना हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. (मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणीकरणा’ची आवश्यकता काय ? यातून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. तसेच विविध ठिकाणी खर्च होणारा पैसा हा केवळ मुसलमान अथवा इस्लामी देशांना मिळावा, हा यामागचा एक उद्देश आहे. त्यामुळे ‘गोकुळ’सारख्या बहुसंख्य हिंदूंच्या दूध उत्पादक शेतकरी संघाने हे प्रमाणपत्र घेता कामा नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

हे ही पहा !!!

The Shocking Truth!! of The Billion-Dollar H@lal Economy – Unmasked by Ramesh Shinde | Changemakers

(अब्जावधी डॉलर्सच्या हलाल अर्थव्यवस्थेचे धक्कादायक सत्य!! – रमेश शिंदे यांनी उघडकीस आणले | चेंजमेकर्स)

(सौजन्य : Prachyam)

‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?

उत्पादनांवर अशा प्रकारचे लोगो असतात (माहितीसाठी)

इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांसाठी अशा प्रकारचे निर्णय घेऊन कृती करणार्‍या दूध उत्पादक संघांच्या उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घातला, तर आश्चर्य वाटू नये !