गाडीचीही केली तोडफोड
(ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय)

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – अंमलबजावणी संचालनालयाने केरळम्चे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन् यांच्या निवासस्थानासह १० ठिकाणी धाडी घातल्या. या धाडी त्यांच्या मुलीच्या ‘एक्सालॉजिक सोल्युशन्स’ आस्थापनाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात घालण्यात आल्या. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी रहित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. या प्रकरणात वर्ष २०२४ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. धाडीनंतर अधिकारी विजयन् यांच्या घरातून बाहेर पडत असतांना विजयन् यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांना मारहाण केली.
पोलिसांनी अधिकार्यांना गाडीत बसवल्यानंतर समर्थकांनी गाडीचा पाठलाग करून दगड-विटांद्वारे तोडफोड केली. गाडीच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. सुदैवाने यात अधिकार्यांना कोणतीही दुखापत झाली नाही; मात्र एक पोलीस शिपाई घायाळ झाला. या आक्रमणावर विजयन् यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. (याचाच अर्थ अशा प्रकारचे आक्रमण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती किंवा त्यांनीच समर्थकांना आक्रमण करण्याचा आदेश दिला, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक)
राहुल गांधी यांना खूप समाधान मिळेल ! – पिनराई विजयन्

धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना विजयन् म्हणाले की, ईडी बर्याच काळापासून माझ्या घरावर धाड घालण्याचा प्रयत्न करत होती. मला वाटते की, या धाडीमुळे काही लोकांना, विशेषतः राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तीला खूप समाधान मिळेल. काँग्रेसची भूमिका अशी आहे की, त्यांच्या स्वतःच्या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांविरुद्ध ईडीचा हस्तक्षेप चालूच राहिला पाहिजे.
राहुल गांधी यांनी ‘पिनराई विजयन् यांच्या घरावर धाड का घातली जात नाही आणि त्यांना अटक का केली जात नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता.
विजयन् यांनी भाजपवर टीका करतांना म्हटले की, केंद्रातील भाजप सरकार देशात विरोधी पक्षनेत्यांवर नेहमीच जाणीवपूर्वक आक्रमणे करत आहे. याविरुद्ध संपूर्ण देशात जोरदार निषेध आंदोलन झाले आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक