स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक १६)
स्त्रीच्या आयुष्यात प्रसुतीनंतरचा काळ (Postnatal period) अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत शरिरावर आलेला ताण, रक्तस्राव, झोपेचा अभाव आणि नवजात बाळाची काळजी यांमुळे स्त्रीमध्ये शारीरिक अन् मानसिक कमजोरी जाणवणे सामान्य आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे अनेक स्त्रीरोग समस्या निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदात या काळासाठी ‘सूतिकाकाल परिचर्या’ ही विशेष संकल्पना सांगितली आहे.
लेखांक १५ साठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1041536.html
१. प्रसुतीनंतरची कमजोरी म्हणजे काय ?
प्रसुतीनंतर शरिरातील रक्त आणि धातू यांची हानी होते अन् वातदोष प्रबल होतो. यामुळे शरिरात अशक्तपणा, वेदना आणि थकवा जाणवतो. ही अवस्था योग्य काळजी घेतल्यास लवकर सुधारते, अन्यथा दीर्घकाळ टिकू शकते.
२. प्रमुख लक्षणे
सतत थकवा आणि अशक्तपणा, पाठदुखी, कंबरदुखी, अंगदुखी अन् सांधेदुखी, भूक न्यून लागणे, केस गळणे, स्तनपान करतांना थकवा, चिडचिड, ताण, तसेच झोपेचा अभाव, ही प्रमुख लक्षणे होत.

३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा
प्रसुतीनंतर शरिरात पुढील पालट होतात –
अ. वातदोष वाढ : वेदना आणि कोरडेपणा निर्माण होतो
आ. रक्त अन् रस धातू क्षय : कमजोरी आणि अशक्तपणा
इ. अग्नी मंद होणे : पचनशक्ती न्यून होणे
ई. ओज न्यून होणे : रोगप्रतिकारशक्ती घट

४. आयुर्वेदाच्या चिकित्सेत विचार करतांना
उपचार करतांना वैद्य प्रसुतीचा प्रकार (Normal / C-section), रक्तस्रावाची मात्रा, स्त्रीची प्रकृती, पचनशक्ती (अग्नी), स्तनपान स्थिती आणि मानसिक स्थिती यांचा विचार करतात.
५. मुख्य उद्देश
वातशमन + धातूपोषण + शक्तीवृद्धी + स्तनपान सुधारणा
६. आयुर्वेद उपचारपद्धत
६ अ. आहार आणि पोषण : प्रसुतीनंतर शरीराला योग्य पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे. तूपयुक्त आहार, सूप, लाडू, दूध, मूगडाळ, खिचडी हे पदार्थ देता येतील.
६ आ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
१. शतावरी : स्तनपान आणि शक्ती वाढवते
२. अश्वगंधा : शक्तीवर्धक आणि वातशामक
३. दशमूल : वेदना न्यून करते
४. जीरकादि कल्प : पचन सुधारते
५. बाह्य उपचार : अभ्यंग (तेल मालिश), स्वेदन (स्टीम) हे उपचार वातशमनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय
गरम पाणी पिण्याची सवय लावावी. प्रतिदिन तेलाने हलके मालिश करावे. पूर्ण विश्रांती घेण्यासह तुपाचा वापर करावा. उबदार वातावरण ठेवणे; थंड पाणी, जड काम टाळण्यासह ताण टाळावा.
८. आहार मार्गदर्शन
अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, सूप, लाडू (गोंद, मेथी, डिंक), हलका आणि पौष्टिक आहार
आ. काय टाळावे ? : थंड पदार्थ, ‘फास्ट फूड’ (पिझ्झा, बर्गर), जड आणि तळलेले पदार्थ
९. मानसिक आरोग्य
प्रसुतीनंतर मानसिक पालट होणे सामान्य आहे. कुटुंबाचा आधार, सकारात्मक वातावरण आणि पुरेशी झोप यांमुळे मानसिक संतुलन राखता येते.
१०. निष्कर्ष
प्रसुतीनंतरची काळजी ही स्त्रीच्या आयुष्यभराच्या आरोग्याचा पाया ठरते. आयुर्वेदातील ‘सूतिकाकाल परिचर्या’ ही संकल्पना स्त्रीला पुन्हा पूर्ववत् शक्ती मिळवून देण्यास साहाय्य करते. योग्य आहार, औषधे, विश्रांती आणि मानसिक आधार यांच्या साहाय्याने स्त्री पूर्णपणे निरोगी होऊ शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
लेखांक १७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1046492.html

६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !
उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा ! – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट ! – जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर