पोलिसांकडून लाठीमार

कपूरथळा (पंजाब) – येथील कारागृहात २३ मेच्या रात्री बंदीवानांनी बराकची (कारागृहातील खोल्यांची) तोडफोड केली. या वेळी कारागृहाच्या पायाभूत सुविधांचीही हानी करण्यात आली. तसेच कारागृहाच्या काही भागांना आग लावण्याचा प्रयत्न केला. एका बंदीवानाशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्यानंतर बंदीवान आणि न्यायप्रविष्ट बंदीवान (अंडरट्रायल्स) यांच्यात हिंसक हाणामारी झाली. कारागृह प्रशासनाने भांडण थांबवण्यासाठी मध्यस्थी केली, तेव्हा बंदीवानांनी अधिकार्यांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या तुरुंगातील पोलीस कर्मचार्यांवरही आक्रमण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
परिस्थिती अधिक बिघडू नये; म्हणून कारागृहाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. ‘परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला’, अशी माहिती एका अधिकार्याने दिली. या हिंसाचारात जीवितहानीविषयी अधिकार्यांनी अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही; मात्र या घटनेनंतर बाहेर किमान ५ – ६ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय