Bangladesh Atrocities Against Hindus : गेल्या ४ महिन्यांत १०० हत्या, २८ बलात्कार आणि ९५ मंदिरांची तोडफोड !

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार चालूच !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक यांच्याविरुद्ध चालू असलेल्या हिंसाचाराविषयी ‘ह्यूमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ने राष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात वर्ष २०२६ च्या पहिल्या ४ महिन्यांत (जानेवारी ते एप्रिल) अल्पसंख्यांकांविरुद्ध छळ आणि हिंसाचार यांच्या ५०५ वेदनादायक घटनांची नोंद झाली आहे. १०० हिंदूंच्या हत्या आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटना घडल्या आहेत, ज्या ४७ वेगवेगळ्या जिल्ह्यांत झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, अपहरण आणि क्रूर मारहाणीच्या १४४ घटना ४९ जिल्ह्यांत नोंदवण्यात आल्या आहेत. यात २८ बलात्कारांचा समावेश आहे, तसेच ९५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. ही आकडेवारी केवळ त्यांचीच आहे, ज्यांची स्वतंत्रपणे ओळख पटली आहे आणि दुजोरा मिळाला आहे. प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते; कारण अनेक लोक भीती आणि सामाजिक दबाव यांमुळे पोलिसांत तक्रार नोंदवत नाहीत.

अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, बांगलादेशात सत्तांतर होऊनही हिंदू आणि इतर दुर्बल समुदायांची स्थिती अजिबात सुधारलेली नाही अन् ते सतत हिंसक आक्रमणे, हत्या आणि दरोडे यांचे बळी ठरत आहेत. हा अहवाल बांगलादेशाच्या सध्याच्या परिस्थितीचा सर्वांत मोठा आणि ठोस दस्तऐवज आहे.

अहवालातील ठळक सूत्रे

संपूर्ण बांगलादेशात पसरले आहे द्वेषाचे जाळे !

संघटनेने सांगितले की, अल्पसंख्यांकांविरुद्धच्या ५०५ घटना केवळ एका छोट्या भागापुरत्या किंवा शहरापुरत्या मर्यादित नाहीत. हे पूर्णपणे एका सुनियोजित कारस्थानाचे आणि देशभर पसरवलेल्या द्वेषाचा परिणाम आहे. हा हिंसाचार बांगलादेशाच्या सर्वच ८ प्रशासकीय विभागांतील ६४ जिल्ह्यांपैकी ६२ जिल्ह्यांत पसरला आहे. म्हणजेच देशाचा असा क्वचितच एखादा कोपरा उरला आहे, जिथे अल्पसंख्यांक समाज स्वतःला सुरक्षित समजू शकेल. यात ग्रामीण भागापासून मोठ्या शहरांपर्यंतचा समावेश आहे, जिथे रहाणारी हिंदु कुटुंबे प्रत्येक क्षण भयाच्या छायेत जगत आहेत.

महिलांवर अत्याचार आणि भूमींवर अवैध नियंत्रण

अल्पसंख्यांक समुदायातील महिला आणि मुली यांना या हिंसाचारात सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. अहवालात महिलांवरील लैंगिक हिंसाचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्कार यांच्या २८ भयानक घटनांचा उल्लेख आहे, ज्या २३ वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडल्या आहेत. हिंदू आणि स्वदेशी (आदिवासी) समुदायांच्या मालमत्तेची हानी करणे, त्यांच्या वडिलोपार्जित भूमींवर बळजबरीने नियंत्रण मिळवणे, घरांना आग लावणे आणि लुटालुटीच्या १३२ मोठ्या घटना समोर आल्या आहेत. पैसा आणि बळ यांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्पसंख्यांक कुटुंबांना बेघर केले जात आहे, जेणेकरून त्यांना देश सोडण्यास भाग पाडले जावे.

‘ह्यूमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’चा अहवाल –

ही आकडेवारी केवळ त्यांचीच आहे, ज्यांची स्वतंत्रपणे ओळख पटली आहे आणि दुजोरा मिळाला आहे. प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते; कारण अनेक लोक भीती आणि सामाजिक दबाव यांमुळे पोलिसांत तक्रार नोंदवत नाहीत.

९५ मंदिरांवर आक्रमण आणि ईशनिंदेचे खोटे आरोप

बांगलादेशात धार्मिक स्वातंत्र्य पूर्णपणे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. केवळ ४ महिन्यांत हिंदूंची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आक्रमणे अन् तोडफोड यांच्या ९५ घटनांची नोंद झाली आहे. जमाव उघडपणे मंदिरांना लक्ष्य करत आहे आणि पवित्र मूर्तींची विटंबना करत आहे.

याखेरीज अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना गोवण्यासाठी ‘ईशनिंदा’ या अस्त्राचा वापर केला जात आहे. एकूण ६ अशी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जिथे लोकांवर खोटे आरोप लावून जमावाला भडकवण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध हिंसाचार करण्यात आला.

सरकार पालटले; पण हिंदूंचे दुःख पालटले नाही !

बांगलादेशातील सत्तांतराचा अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही. वर्ष २०२५ मध्ये महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळातही हिंदूंवर भीषण अत्याचार झाले होते, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. त्या काळात हिंदूंच्या विरोधात तब्बल साडेतीन सहस्र आक्रमण-अत्याचार यांच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये जेव्हा नवीन निवडून आलेले सरकार सत्तेत आले, तेव्हा परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती; परंतु ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सरकारच्या काळातही हा हिंसाचार त्याच वेगाने चालू आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हे संकट कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून तिथल्या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे.

प्रशासनाची गप्प बसण्याची भूमिका आणि कायद्याची थट्टा

अहवालात बांगलादेशाच्या कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन यांवर अत्यंत गंभीर प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत. पीडित कुटुंबांचा आरोप आहे की, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आक्रमण होते, तेव्हा तेव्हा पोलीस एकतर खूप उशिरा पोचतात किंवा प्रकरणाचा तपास दुर्बल करतात. गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्यामुळे त्यांचे धैर्य वाढले आहे. पीडित आणि साक्षीदार यांना धमकावले जाते, जेणेकरून त्यांनी न्यायालयाची पायरी चढू नये. अशा संस्थात्मक अपयशामुळे अल्पसंख्यांक समाज पूर्णपणे खचला असून तो प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहे.

इतर संघटनांचे अहवालही साक्ष देत आहेत

‘ह्यूमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’व्यतिरिक्त बांगलादेशातील इतर मानवाधिकार संघटनाही या दाव्यांना दुजोरा देत आहेत. यापूर्वी ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन एकता परिषदे’नेही एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये जानेवारी ते मार्च या काळात १३३ धार्मिक अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख होता. त्या अहवालात २५ हत्या, महिलांवरील अत्याचार आणि ३५ मंदिरांमधील लुटालुटीची माहिती होती.

या सर्व अहवालांचा एकच निष्कर्ष निघतो की, जर बांगलादेश सरकारने त्वरित कठोर पावले उचलली नाहीत आणि दोषींना शिक्षा दिली नाही, तर आगामी दिवसांत अल्पसंख्यांक लोकसंख्येचे तिथे टिकून रहाणे अशक्य होईल.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात कोणतेही सरकार असले, तरी तेथील हिंदूंचा वंशसंहार थांबणार नाही; कारण मुसलमान ‘मुसलमान’ असतात; मग ते कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांच्यातील हिंदुद्वेष संपू शकत नाही !
  • या संदर्भात हिंदूबहुल भारत आणि भारतातील हिंदूंच्या संघटना अन् १०० कोटी हिंदू निष्क्रीय रहातात, हे त्यांना लज्जास्पद !