यवतमाळच्या ३४ मुलींची विक्री : भीषण विनाशाचे संकेत !
पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेवर आज वासना आणि मानवी तस्करी यांचा जो वार झाला आहे, त्याने संपूर्ण देश हादरून गेला पाहिजे ! नाशिकमध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’, परतवाड्याचा (जिल्हा अमरावती) नराधम अयाज आणि आता यवतमाळच्या राळेगावमधील तब्बल ३४ मुलींची विक्री अन् धर्मांतर यांचा हा भीषण बाजार… हे सगळे काय चालू आहे ? आमचा महाराष्ट्र आता लेकींच्या विक्रीचा ‘कत्तलखाना’ झाला आहे का ?

१. हिंदु मुलींना जाळ्यात कसे ओढले जाते ?
मजहर कुरेशीसारखे लांडगे जेव्हा राजरोसपणे ३४ निरागस मुलींच्या आयुष्याचा सौदा करतात, तेव्हा हे केवळ प्रशासनाचे अपयश नाही, तर ते हिंदु समाजाच्या गाफीलपणाचेही फळ आहे ! या मानवी तस्करीच्या रॅकेटची कार्यपद्धत इतकी विषारी आहे की, ती वाचतांनाही अंगावर काटा येतो. हे लांडगे थेट शिकार करत नाहीत, तर आधी जाळे विणतात. हिंदु समाजातील काही ‘कलंकित’ आणि ‘फितूर’ महिलांना हाताशी धरून हा खेळ खेळला जातो. सर्वांत आधी गरिबी किंवा मध्यमवर्गीय गरजांचा अपलाभ घेतला जातो. ‘चांगली नोकरी लावून देतो’, ‘महिना २० सहस्र रुपये मिळतील’, असा पैशांचा खोटा मोह दाखवून लेकींना जाळ्यात ओढले जाते आणि एकदा ही मुलगी त्यांच्या ताब्यात गेली की, अमली पदार्थांच्या किंवा दहशतीच्या विळख्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडिओ बनवले जातात. तेथून चालू होतो तो कधीही न संपणारा नरकवास ! त्या लेकीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचा सौदा करून अखेरीस तिला धर्मांतराच्या हिडीस भट्टीमध्ये ढकलले जाते.
२. घरभेद्यांना वेळीच आवरा !

हे केवळ मानवी तस्करीचे रॅकेट नाही, तर हा एक सुनियोजित ‘धार्मिक अजेंडा (कार्यसूची)’ आहे ! ३४ मुलींपैकी बहुतांश मुलींचे धर्मांतर झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, ‘एका बाजूला हिंदु मुलींची संख्या न्यून करायची आणि दुसर्या बाजूला त्यांना अशा दलदलीत ढकलायचे जिथून परत येण्याचे सर्व रस्ते बंद होतील.’ मजहर कुरेशीसारखे नराधम जेव्हा हिंदु देवीदेवतांचा अवमान करतात, तेव्हाच त्यांची मानसिकता जगासमोर आली होती; पण दुर्दैव असे की, ‘जातीय सलोख्याच्या’ खोट्या बुरख्यात अडकून आपण अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचायला विसरलो ! सर्वांत संतापजनक, म्हणजे या मजहरच्या पापात चक्क हिंदूंना कलंक लावणार्या काही फितूर महिलांनीही साथ दिली आहे. पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या काळजाची विक्री करणार्या या घरभेद्या महिला केवळ गुन्हेगार नाहीत, तर त्या आपल्या समाजाला लागलेली वाळवी आहेत. अशा महिलांच्या मुसक्या आवळून त्यांना भर चौकात उभे केले पाहिजे; कारण शत्रू जेव्हा घराच्या उंबरठ्यापर्यंत पोचतो आणि घरचीच माणसे त्याला दार उघडून देतात, तेव्हा विनाश अटळ असतो !
३. ‘हिंदु’ म्हणून संघटित आणि सतर्क होण्याची आवश्यकता !
आज राळेगावची जनता जातीचा चिखल गाडून एकत्र आली आहे, हाच या संकटावरचा खरा ‘एल्गार’ (युद्ध पुकारणे) आहे. आपण ‘कुणबी’, ‘तेली’, ‘माळी’ म्हणून किती काळ विखुरलेले रहाणार ? लक्षात ठेवा, जेव्हा मजहर कुरेशी एखाद्या मुलीला उचलतो, तेव्हा तो तिची जात बघत नाही, तो केवळ त्याची ‘शिकार’ बघतो. जर आपण जातीपातीत अडकून पडलो, तर उद्या एकेका जातीच्या लेकीची शिकार होईल आणि आपण केवळ निषेध नोंदवत बसू. आता वेळ आली आहे, ‘जात-पात वेशीवर टांगून ‘हिंदु’ म्हणून संघटित होण्याची !’
जर आपण आज सतर्क झालो नाही, तर येणारा काळ इतका भीषण असेल की, आपल्या घरातील लेकींना घराबाहेर पडणेही कठीण होईल. राजकारणी केवळ मते मोजतील; पण वेदना तुमच्या वाट्याला येतील. या नराधमांना आणि त्यांच्या फितूरांना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आता शांत बसायचे नाही ! बुलडोझर कारवाईवर समाधान न मानता या लांडग्यांना अशी शिक्षा द्यावी की, महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा कुणाचेही असे धाडस होणार नाही. सावध रहा, सतर्क रहा आणि एकवटून या विकृतीचा कोथळा बाहेर काढा ! प्रत्येक पीडितेला न्याय मिळेपर्यंत हा वणवा शांत होता कामा नये !
– श्री. राहुल कालिंदी रमेशराव दारुणकर, कार्यकारी संपादक, ‘लोकराज्य’ न्यूज मराठी, यवतमाळ.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष