(म्हणे) ‘बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणारच !’ – MLA Humayun Kabir Challenges

आमदार हुमायू कबीर यांचे बंगाल सरकारला आव्हान

हुमायू कबीर व शुभेंदु अधिकारी

मुर्शिदाबाद (बंगाल) – बंगालमधील भाजप सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसारित करतांना, गायीसह आजारी आणि अल्प वयाच्या प्राण्यांच्या बळींवर बंदी घातली आहे. तसेच सरकारने यापूर्वीच राज्यात गोहत्या करण्यावर बंदी घातली असतांना ‘बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणारच’, अशी घोषणा येथील आमदार हुमायू कबीर यांनी केली आहे. (आमदार हुमायू यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबावे आणि त्यांना सरळ करावे, म्हणजे ते पुन्हा असे बोलण्याचे अन् गोहत्या करण्याचे धाडस करणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) आमदार हुमायू हेच येथे बाबरी मशीद बांधत आहेत.

आमदार हुमायू कबीर म्हणाले की, मी मख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांना थेट सांगत आहे, आगीशी खेळू नका. जर त्यांनी बळी देण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतील. बळीच्या संदर्भात मुसलमान कोणतीही तडजोड करणार नाही. बकरी ईदच्या दिवशी गायींचा बळी निश्चितच दिला जाईल; मग शुभेंदु काहीही करू देत.

(म्हणे) ‘जर धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर राज्यातील वातावरण बिघडेल !’

नमाजपठणाच्या सूत्रावर सरकारने प्रसारित केलेल्या निर्देशांवरही हुमायू कबीर यांनी धमकी देत म्हटले की, जर धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर राज्यातील वातावरण बिघडेल आणि त्यास सरकारच उत्तरदायी असेल.

मुसलमान संघटनांचेही हुमायू यांना समर्थन !

आमदार हुमायू यांच्या या विधानानंतर काही मुसलमान संघटना उघडपणे हुमायू  यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. ‘धार्मिक स्वातंत्र्य हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे कोणत्याही समुदायाच्या परंपरांवर बंदी घालण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये’, असे मुसलमान संघटनांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आता जिवंत असते, तर त्यांनी ‘या दिवशी कुणी गोहत्या करत असेल, तर हिंदूंनी डुकराचा बळी द्यावा आणि डुकराच्या मांसांची मेजवानी आयोजित करावी’ अशी घोषणा केली असती, असेच कुणालाही वाटेल !
  • बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांची बकरीचा बळी देण्याची परंपरा असतांना केवळ हिंदूंचा अवमान करण्यासाठीच आतापर्यंत गोहत्या करण्यात येत आहे. अनेक राज्यांत गोहत्येवर बंदी असतांनाही मुसलमान जाणीवपूर्वक गोहत्या करतात. त्याच मानसिकतेतून हुमायू कबीर आव्हान देत आहेत. अशांविरुद्ध आता हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे अपरिहार्य आहे !