आफ्टेनपोस्टेन’ या नॉर्वेच्या सर्वांत मोठ्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले अपमानजनक व्यंगचित्र

ऑस्लो (नॉर्वे) – ‘आफ्टेनपोस्टेन’ या युरोपमधील नॉर्वे देशाच्या सर्वांत मोठ्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वर्णद्वेषी व्यंगचित्र प्रसिद्ध केले. यात पंतप्रधानांना एका गारुड्याच्या रूपात दाखवून त्यांनी पेट्रोल पंपाचा पाईप पकडला आहे, जो सापासारखा दिसत आहे, असे रेखाटण्यात आले. या व्यंगचित्रासमवेत ‘एक धूर्त आणि थोडा त्रासदायक माणूस’ अशा शीर्षकाचा एक वैचारिक लेखही प्रसिद्ध करण्यात आला. या वृत्तपत्रावर सर्व स्तरांतून कडाडून टीका केली जात आहे. भारताविषयी पाश्चात्त्य जगाचा विकृत दृष्टीकोन ठेवल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधानांनी नुकताच त्यांचा नॉर्वेचा दौरा आटोपल्यानंतर वृत्तपत्राने हा वाद निर्माण केला.
🛑Aftenposten, Norway’s largest newspaper, has published a demeaning racist caricature depicting Prime Minister Modi as a snake charmer alongside an opinion piece titled “A clever and slightly annoying man”, soon after the Prime Minister concluded his visit to Norway.
🔥The… pic.twitter.com/RPfCfuPsaW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2026
भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी वृत्तपत्राचा घेतला खरपूस समाचार !![]() भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी यावर प्रतिक्रिया देतांना लिहिले, ‘५६ लाख लोकसंख्या असलेल्या एका आत्मसंतुष्ट देशाचे हे व्यंगचित्र अत्यंत त्रासदायक आहे. या देशाकडे ना ऐतिहासिक किंवा सभ्यताविषयक खोली आहे, ना जटिल आणि वैविध्यपूर्ण समाज हाताळण्याचा अनुभव आहे अन् ना १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर असलेल्या आव्हानांच्या खोलीचा अंदाज आहे. यात भारताच्या संदर्भात ‘साप-गारुडी’ या अपमानजनक आणि रुढीवादी प्रतिमेचा आधार घेण्यात आला आहे, ज्यात वर्णद्वेषाची झलक दिसते. भारताला नॉर्वेच्या तेलाची आवश्यकता नाही. त्याच्या शेजारीच तेलाने समृद्ध अनेक मोठे देश आहेत. भारताला त्यांना आकर्षित करण्याचीही आवश्यकता नाही; कारण भारत स्वतः एक खूप मोठी बाजारपेठ आणि तेलाचा दुसरा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. हे व्यंगचित्र नॉर्वेच्या पत्रकारितेचा उथळपणा दर्शवते; कारण हे त्या देशातील सर्वांत मोठे वृत्तपत्र आहे. |
सर्वसामान्य भारतियांनीही या व्यंगचित्राला वर्णद्वेषी ठरवत त्याचा संबंध वसाहतवादी काळातील पाश्चात्त्य देशांच्या मानसिकतेशी जोडला आहे. त्या काळात पाश्चात्त्य जग भारताला साप आणि गारुडे यांच्याशी जोडत असे. अनेक लोकांनी वृत्तपत्रावर कडक टीका करतांना म्हटले की, हे चित्र भारताविषयी द्वेष पसरवणारे आणि एका लोकनियुक्त नेत्याचा अपमान करणारे आहे.

‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले