
पुणे – शासकीय कृषि महाविद्यालयाच्या ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रा’स राज्य सरकारने ७२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात प्रयोगशाळा उभारणी, शेतकरी वसतिगृह, प्रशिक्षण कक्ष आणि प्रशासकीय इमारती यांसह अन्य कामांना प्रारंभ झाला आहे. पुढील २ वर्षांत हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ यांनी व्यक्त केली.
या केंद्रात भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायींचे संवर्धन, संगोपन आणि जतन केले जाते. यात सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी आदी देशी गायींचे प्रात्यक्षिक विभाग सिद्ध केले आहेत. या प्रकल्पात १३ हून अधिक भारतीय देशी गायींच्या जातींचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. या निधीतून पहिल्या टप्प्यात अद्ययावत् गायींचे गोठे, ‘सायलो’ बंकर उभारणी, बायोगॅस निर्मिती विभाग, ‘कंपोस्टिंग’ आणि साठवणूक विभाग, प्रयोगशाळा उभारणी, जुन्या गोठ्यांचे नूतनीकरण, दुग्ध प्रयोगशाळा, प्रदर्शनकक्ष, अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थाने यांचा समावेश आहे.
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !