
पुणे – अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव ‘कृतज्ञताभावा’ने विविध आध्यात्मिक उपक्रमांच्या आधारे भारतभर साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३१ ठिकाणी प्रभु श्रीरामाला ‘रामराज्य’ येण्यासाठी साकडे घालण्यात आले आणि राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

याला १ सहस्र ६०५ हून अधिक धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यासाठी मंदिर स्वच्छतेचेही उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहेत. यामध्ये कोथरूड, राजगुरुनगर, सिंहगड रस्ता, दौंड, तळेगाव, कोथरूड, मंचर, हडपसर, थेरगाव, वल्लभनगर, चिंचवड, भोसरी आदी ठिकाणे आहेत.

क्षणचित्रे
१. वैष्णोदेवी मंदिर, जम्मू येथे धर्माभिमानी हिंदूंनी रामराज्यासाठी साकडे घातले आणि प्रार्थना केली.
२. पारगाव येथील धर्मप्रेमी श्री. गणेश ताकवणे सहकुटुंब आणि नातेवाइकांसमवेत केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले असतांना त्यांनी तेथे हिंदुराष्ट्रासाठी साकडे घातले.
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !