प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गंगानदीच्या पात्रात मांसाहारी अन्नाचा कचरा टाकल्याने हिंदु समुदायाच्या भावना दुखावू शकतात, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मार्च महिन्यात गंगानदीत एका नौकेवर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १४ मुसलमान पुरुषांपैकी ५ जणांना जामीन संमत करतांना न्यायमूर्ती राजीव लोचन शुक्ला यांनी हे निरीक्षण नोंदवले.
🚨 Dumping non-vegetarian food waste into the Ganga can hurt Hindu religious sentiments, observed the Allahabad High Court while granting bail to 5 of the 14 accused in the Ganga boat Iftar party case.
When Hindu sentiments are hurt, many remain passive or limit themselves to… https://t.co/2Gy4K4VUq5 pic.twitter.com/d7ezonn3Jb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2026
१. न्यायालयाने म्हटले की, आरोपींनी व्यक्त केलेली पश्चात्तापाची भावना जामीन संमत करण्यासाठी विचारात घेतली जाऊ शकते. केवळ आरोपींनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनीही समाजाला झालेल्या वेदनांबद्दल खेद व्यक्त केला आहे.
२. न्यायालयाने पुढे असेही निरीक्षण नोंदवले की, आधी आरोपींवर लावण्यात आलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेचे प्रावधान नाही. तसेच आरोपींनी नावाड्याची नौका बळजबरीने कह्यात घेण्यासंदर्भात नावाड्याने केलेल्या तक्रारीवरही न्यायालयाने संशय व्यक्त केला. न्यायालय म्हणाले की, प्रकरण नोंदवण्यापूर्वी संबंधित नावाड्याने त्याच्यासमवेत झालेल्या खंडणी किंवा बळजबरीविषयी कोणतीही तक्रार केली नव्हती. नावाड्याने हे आरोप करण्यात केलेला विलंब त्याच्या कथेवर संशय निर्माण करतो, असे न्यायालयाने जोडले.

हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !