
‘हिंदूंचे हेच दुर्दैव आहे की, भारत हा अधिकृतपणे हिंदूंचा देश असला, तरी त्याच्याच राज्यघटनेने त्याला निधर्मी आणि सर्वधर्मसमभावी (सेक्युलर) ठरवला आहे. धर्म हा हिंदूंचा अन् हिंदुस्थानचाही प्राण आहे. ‘आपण ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मी) स्वीकारला आहे’, असे आम्हाला सतत सांगितले जाते. कुणी स्वीकारला ? स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’

हुशार मुसलमान आणि मूर्ख हिंदू !
‘मुसलमानांना मात्र सहजासहजी इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी या देशाचा एक तुकडा तोडून देण्यात आला. रक्ताचा थेंब न सांडता पाकिस्तान झाले आणि रक्ताचे पाट वाहूनही हिंदुस्थान अजूनही जन्माला आले नाही. आम्हाला हिंदु धर्माला स्थान नसलेला धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा ‘भारत’ लाभला. या भारतात लोकशाहीच्या गठ्ठा मताच्या महत्त्वापायी इस्लामी अनुनयाची अहमहमिका चालू झाली आणि ‘धर्माच्या आधारावर मते मागू नयेत’, अशा प्रकारच्या बंधनाने हिंदु बहुमताच्या ‘धर्म’ या मूळ आधारालाच ठेचून टाकण्यात आले.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ ग्रंथातून)
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
भारताचा उद्धार होण्यासाठी…
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
वीर सावरकर उवाच