‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून धर्मकार्यासाठी लढाई
गुरु गोविंदसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, भगतसिंह, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा अनेक देशभक्तांनी देशासाठी प्राणार्पण केले. त्यांच्यासारखे आपल्यालाही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी लढावे लागेल. मी प्रत्येक मासामध्ये १० ते १५ दिवस यथाशक्ती हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी दुसर्या राज्यांमध्ये फिरत असतो. कारावासात जाणे-येणे माझ्यासाठी नेहमीचे झाले आहे. मी एकदा नगरसेवक आणि ३ वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. माझे धर्मकार्य थांबवण्यासाठी शत्रू माझ्या कुटुंबाला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे माझी मुले उघडपणे शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नसल्याने त्यांचे शिक्षण खासगी शिकवणीद्वारे चालू आहे. आजही माझ्या मुलांना बाहेर कुठेही ‘बुलेटप्रूफ’ गाडीतूनच पाठवावे लागते. मी आणि माझे कुटुंब यांना २४ घंटे संरक्षण दिले जाते.
आमदार टी. राजासिंह यांचा परिचय

तेलंगाणा येथील श्री. टी. राजासिंह हे ‘श्रीराम युवा सेने’चे अध्यक्ष आहेत. ते सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोरक्षणासह देशभरात राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित सभांच्या माध्यमातून हिंदु समाजाला जागृत करण्याचे कार्य करतात. देशभरातील हाताच्या बोटांवर मोजल्या जाणार्या कट्टर हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. त्यांनी भाग्यनगरमध्ये शेकडो युवकांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवले आहे. त्यांना धर्मांधांकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येतात, तरीही ते प्राणपणाला लावून धर्मकार्य करत आहेत.
२. प्रशासनातील उच्च पदांवर हिंदुत्वनिष्ठ अधिकारी बसण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे अपेक्षित !
भारताला इस्लामी देश बनवण्यासाठी धर्मांध अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. त्यांची ‘हम चार, हमारे चालीस’ (आम्ही ४ आणि आमचे ४०), अशी योजना चालू आहे आणि हिंदूंची योजना ‘हम दो, हमारे दो’ (आम्ही दोघे आणि आमची दोन मुले)वरून ‘हम दो, हमारा एक’ (आम्ही दोघे आणि आमचे एक मुल)वर आली आहे. धर्मांधांना पाकिस्तान मिळाल्यावर ते शांत बसतील, असे आपल्याला वाटले होते; परंतु आता ते हिंदुस्थानलाच इस्लामी राज्य बनवू पहात आहेत. त्यामुळे देशातील कोणताही मोठा अधिकारी त्यांनाच साहाय्य करील आणि हिंदुत्वनिष्ठांना निष्कारण कारावासात डांबले जाईल. याचा अनुभव मी घेतला आहे. काही वर्षांपूर्वी मला ‘प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्या’च्या (‘िप्रव्हेंटिव्ह डिटेंशन लॉ’च्या) अंतर्गत कारागृहात पाठवण्यात आले होते, तेव्हा मी तब्बल ७२ दिवस आतमध्ये राहिलो. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून मला जामीन मिळणार होता; पण जेव्हा जेव्हा माझी धारिका सुनावणीसाठी बेंचवर यायची, तेव्हा एक धर्मांध तिला बाजूला करत होता. तो दंडाधिकारी पालटल्यावरच मला न्यायालयातून जामीन मिळाला.
त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या मुलांना उच्च पदावर बसवण्यासाठी नियोजनपूर्वक कार्य केले पाहिजे. संसदेतील खासदार कायदा बनवतात. त्यामुळे संसदेत हिंदुत्वाच्या विचारसरणीचे किमान ५० खासदार असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी अधिक सशक्तपणे कार्य करता येईल.
| हे ही वाचा → धर्मासाठी प्रसंगी प्राणार्पण करण्यास सिद्ध असलेले भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदु धर्माभिमानी आमदार टी. राजासिंह ! |
३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बलीदानाची सिद्धता हवी !
तेलंगाणामध्ये वर्ष २०१८ मधील निवडणुकीत हिंदु म्हणून मी एकटाच जिंकलो होतो. वास्तविक माझ्या मागे कुणा मोठ्या राजकीय नेत्याचे पाठबळ नाही, तरीही मला हात लावतांना मुख्यमंत्र्यांना पुष्कळ विचार करावा लागतो; कारण माझ्या पाठीशी केवळ भगवंताचा आणि हिंदूंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी मृत्यूला घाबरू नये. जो मृत्यूला घाबरतो, तो जीवनात काहीच करू शकत नाही. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी लढणार्यांना प्रसंगी कारागृहातही जावे लागेल. त्यामुळे धर्मासाठी बलीदान देण्याची सिद्धता ठेवली पाहिजे. तेलंगाणात निधर्मी सरकार असल्यामुळे प्रशासनाने श्रीराम शोभायात्रेला अनुमती दिली नाही; परंतु यावर्षी अक्षरशः लक्षावधीच्या संख्येने रामभक्त बाहेर निघाले आणि भव्य रूपात ‘रामनवमीची शोभायात्रा’ यशस्वी झाली. अशा भव्य शोभायात्रा किंवा सभा देशात ठिकठिकाणी आयोजित केल्यास तेथे येण्याची माझी सिद्धता आहे.
देशभरातील राजकारणी त्यांची परंपरा त्यांच्या मुलाने चालवावी, यासाठी प्रयत्नरत असतात. आपण आपले हिंदुत्वाचे कार्य पुढेही चालू रहावे, यासाठी प्रयत्न करतो. आपल्या मुलांना हिंदुत्वाच्या मार्गावरून नेले नाही, तर येणार्या काळात ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज उठवणार कोण ? एका शोभायात्रेत मी माझ्या मुलाला समोर उभे केले होते. तेव्हा शत्रूंनी माझ्या मुलाचे अपहरण करण्याची चेतावणी दिली होती. त्या वेळी ‘धाडस असेल, तर माझ्या मुलाला उचलून दाखवा’, असे आवाहन दिले होते. ‘जोपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवत नाही, तोपर्यंत माझा जीवनकाळ आणि माझा प्राण यांचा त्याग करतो’, असा संकल्प केला आहे. माझ्यानंतर माझी ३ मुले आहेत. ज्येष्ठ मुलगा धर्मकार्य करतांना कामी आला, तर उरलेली २ मुले सिद्धच असतील. त्यामुळे प्रथम आपल्या मनात त्याग करण्याची भावना निर्माण करा आणि जोरदार साधना करायला हवी. त्यामुळे हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी हिंदू संघटित होतील आणि हिंदूंप्रती नेते सकारात्मक होतील.’
– आमदार श्री. टी. राजासिंह, गोशामहल, भाग्यनगर, तेलंगाणा
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर