
मुंबई – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व म्हणजे महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा ५ कोटी रुपयांचा निधी, छोट्या संस्थाना साठी प्रति संस्थान १५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभपर्व आढावा बैठकीत केली.
Maharashtra CM Devendra Fadnavis unveils the official emblem of the Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela.
₹5 crore fund announced for each Akhada participating in the Kumbh Mela
A corridor will be developed in the Trimbakeshwar temple area, which will provide extensive… pic.twitter.com/G53IkhKenB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या. आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी (पैसे देणे), आखाड्याची भूमी शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा भूमी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ‘कुंभपर्वासाठी जगभरातून येणारे साधू, महंत आणि भाविक यांची सेवा करत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज महामार्ग) उभारण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होतील. नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोद्धार करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्मपूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील कुंभपर्वापेक्षा यावेळेच्या आयोजनामध्ये गोदावरी नदीचे स्वच्छ स्वरूप आपल्याला सर्वांना दिसणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.’’
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कुंभपर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे आयोजन अत्यंत दिमाखदार स्वरूपात पार पडेल. कुंभपर्वाच्या सुरक्षिततेत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही.’’
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री