Assam UCC : आसाममध्ये समान नागरी कायदा लागू होणार

२६ मे या दिवशी विधानसभेत विधेयक मांडणार

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

दिसपूर (आसाम) – आसाम विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला संमती देण्यात आली असून २६ मे या दिवशी विधानसभेत हे विधेयक मांडले जाणार आहे. सरकारने या कायद्यातून आदिवासी समुदायाला पूर्णपणे बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड, गोवा आणि गुजरातनंतर आता आसाम हा कायद लागू करणारे राज्य ठरेल.

या कायद्यांतर्गत वारसाहक्क, विवाह, लिव्ह-इन रिलेशनशिप (विवाह न करता एकत्र रहाणे) आणि विवाह-घटस्फोटाची अनिवार्य नोंदणी यांसारख्या सूत्रांचा समावेश असेल.

संपादकीय भूमिका

एकेका राज्यांत हा कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशासाठी एकच कायदा केंद्र सरकारने करणे अपेक्षित आहे, अन्यथा ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार आहे, त्याच राज्यांत हा कायदा होईल आणि अन्य राज्यांत तो होणार नाही. देशाच्या दृष्टीने हे योग्य नाही !