अजेंद्र लोधी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) !
समाजवादी पक्षाचे खासदार अजेंद्र लोधी यांची पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हमीरपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार अजेंद्र लोधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. व्हिडिओमध्ये जेव्हा पत्रकार त्यांना विचारतात की, पंतप्रधान मोदी यांनी एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर अल्प करण्यास सांगितले आहे, तेव्हा अजेंद्र लोधी उत्तरादाखल पंतप्रधानांना ‘हरामी’ आणि ‘देशविरोधी’ संबोधतात. भाजपचे नेते सत्येंद्र प्रताप गुप्ता यांनी या प्रकरणी उत्तरप्रदेशच्या महोबा येथे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
🚨 Mahoba, Uttar Pradesh:
“Never seen such a b****§¢§ and anti-national Prime Minister”!⚠️ Abusive remarks against Prime Minister Narendra Modi by Samajwadi Party leader Ajendra Lodhi.
📢 Complaint has been lodged against Ajendra Lodhi.
❓While opposing the Prime Minister,… pic.twitter.com/8FteBbGcM1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 14, 2026
१. व्हिडिओमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदाराने आधी टोमणा मारतांना म्हटले, ‘मोदीजी जे बोलतात ते अतिशय चांगले बोलतात, सोने खरेदी करू नका, पेट्रोलचा वापर अल्प करा; पण स्वतः परदेश दौरे करून कोट्यवधी रुपये खर्च करतात.
२. त्यानंतर शिवीगाळ करत अजेंद्र लोधी म्हणतात, ‘इतका हरामी आणि देशविरोधी पंतप्रधान आजपर्यंत कुणी पाहिला नाही आणि येणार्या सरकारांमध्येही असा पंतप्रधान कुठलाही पहायला मिळणार नाही.’
जनता वेळ आल्यावर उत्तर देईल ! – योगी आदित्यनाथ
या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एका खासदाराने केलेली असंसदीय टिपणी केवळ अशोभनीय आणि अक्षम्यच नाही, तर त्यांनी अशी वक्तव्ये करून भारतीय लोकशाहीच्या मर्यादांवरही गंभीर आघात केला आहे. हे कृत्य राजकीय कुसंस्कार, वैचारिक दिवाळखोरी आणि सार्वजनिक जीवनातील शालीनतेप्रती असलेला अनादर प्रकट करते. हा १४५ कोटी देशवासियांच्या जनादेशाचा, विश्वासाचा आणि भारताच्या लोकशाही प्रतिष्ठेचाही अपमान आहे. देशातील जनता अशा अमर्याद वर्तनाचे उत्तर वेळ आल्यावर नक्कीच देईल.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ