Shahzad Bhatti Radicalism : महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून राज्यभरात धाडी !

  • पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्यामुळे भारतीय तरुण कट्टरतावाद आणि हेरगिरी यांसाठी प्रवृत्त !

  • सामाजिक माध्यमांद्वारे गुंडांशी जोडलेल्यांची चौकशी होणार !

गुंड शहजाद भट्टी

मुंबई – पाकिस्तामधील कुख्यात गुंड शहजाद भट्टी हा दुबईतून सामाजिक माध्यमांद्वारे भारतीय तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरी करण्यास प्रवृत्त करत आहे. यामध्ये सहभागी होणार्‍या तरुणांना यासंदर्भात कोणतीच कल्पना नाही. याची माहिती मिळताच महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मुंबई, पुणे, नालासोपारा, मीरारोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे धाडी घातल्या.

सामाजिक माध्यमांद्वारे गुंडांशी जोडलेले आणि त्याचे समर्थन करणारे, अशांची पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गुंडांची यंत्रणा मोडीत काढण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. शहजाद भट्टी याच्या संपर्कात असणार्‍यांचीही चौकशी केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय तरुण राष्ट्रहित लक्षात घेऊन सतर्क रहातील का ?