‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगामी ग्रंथाची सेवा करतांना पुढील सूत्रे माझ्या वाचनात आली. तेव्हा माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतःतील देवत्वाची स्वीकृती देणे
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे उद्गार : वर्ष २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्यशाळेत जिज्ञासूंना मार्गदर्शन करत होते. तेव्हा ते एका साधिकेला म्हणाले, ‘‘आपल्याला देव भेटतो, तेव्हा आपले मन आणि बुद्धी कार्यरत नसतात. आपण आनंदावस्थेत असतो अन् या स्थितीत शब्द नसून सर्व शब्दांच्या पलीकडचे असते. हीच स्थिती तुम्ही अनुभवत आहात.’’
१ आ. वरील उद्गार वाचून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया : हे सूत्र वाचून मला वाटले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘ते आणि देव वेगळे नाहीत’, याची अप्रत्यक्षपणे स्वीकृतीच दिली आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अहंशून्यता !

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उद्गार ! : ‘मला ‘भाव तेथे देव’ हे ज्ञात असल्याने आता अधिकाधिक काळ भावावस्थेत रहाण्यासाठी मी ज्ञानयोग आणि कर्मयोग या विषयांवरील ग्रंथ अधिक न वाचता केवळ भक्तीयोगानुसारच्या ग्रंथांचे वाचन करत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३.६.२०२३)
२ आ. वरील उद्गार वाचून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया : हे विचार वाचून मला वाटले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् भगवंतच आहेत. त्यांच्यात आणि भगवंतात द्वैत राहिलेलेच नाही. असे असतांनाही ते सर्वसामान्य साधकाप्रमाणे ‘अधिकाधिक भावावस्थेत रहाण्यासाठी …’, अशा प्रकारचे विचार व्यक्त करत आहेत. यातून त्यांची अहंशून्य स्थिती लक्षात येते.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२६)

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !