पुणे – वारकरी संप्रदायातील संत आणि महापुरुष यांविषयी सातत्याने गरळ ओकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर लोणी काळभोर परिसरात १० मे या दिवशी संतप्त हिंदूंनी शाईफेक केली.
Pune: Ink Thrown on (NCP-SP) spokesperson Vikas Lawande over repeated derogatory remarks against the Saints and Spiritual leaders of the Warkari Sampradaya.
“Insult to Saints will not be tolerated!” –@AcharyaBhosale
'Calling revered Saints “intruders” is an attack on Hindu… https://t.co/LVMGeOY9Bv pic.twitter.com/Z2U1gvXYz7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 9, 2026
विकास लवांडे हे सकाळी प्रवचनाला जात असतांना संग्राम भंडारे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. या वेळी लवांडे यांनी हिंदु संतांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
हे ही वाचा → |
संतांचा अपमान सहन केला जाणार नाही ! – आचार्य तुषार भोसले, आध्यात्मिक आघाडी

विकास लवांडे सातत्याने वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या महान संतांवर अत्यंत हीन भाषेत टीका करत होता. ज्या संतांनी महाराष्ट्रात व्यसनमुक्ती आणि संस्कार यांचे कार्य उभे केले, ज्यांचे लाखो अनुयायी आहेत, त्यांना ‘घुसखोर’ संबोधून अपमानित करण्याचे पातक याने केले आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर केलेला आघातच आहे. माझे यानिमित्ताने शरद पवार यांना आवाहन आहे की, आता तरी तुम्ही तुमच्या समर्थकांना आवरा आणि या महाराष्ट्राचा अन् महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणे थांबवा.

Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !