‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सदैव मनात ठेवून सैन्यदलात भरती व्हा !

‘पुत्रविरहाचे दुःख हे माता-पित्याच्या दृष्टीने पुष्कळ मोठे असते; परंतु ते दुःख देत असतांना देवाने आमच्यावर उपकार केले आहेत. या दुःखाला अभिमानाची झालर आहे. आमचा मुलगा हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे याने देशासाठी दिलेले सर्वोच्च बलीदान प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. कौस्तुभचा आदर्श ठेवून मुलांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. देशाला आज तुमची आवश्यकता आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सदैव आपल्या मनात असला पाहिजे. – वीरमाता ज्योती रावराणे


श्री. चेतन राजहंस

धर्म एकमात्र अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला शिकवते की, शुभकर्म आणि पापकर्म काय आहे ? सध्याच्या निधर्मी राज्यव्यवस्थेने हिंदूंना धर्मच शिकवलाच नसल्याने अनेक जण पापाचरण करत आहेत. परिणामी सर्वत्र भ्रष्टाचार अन् अनैतिकता वाढली आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.