पृथ्वीपासून ४८.५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘एल्.एच्.एस्. ३८४४ बी’ या ग्रहाच्या पृष्ठभागाचा झाला अभ्यास !
१ प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाच्या अतीवेगवान गतीने १ वर्ष पुढे गेलो, तर जेवढे अंतर कापू, तेवढे अंतर. प्रकाशाचा वेग हा ३ लाख किमी प्रतिसेकंद एवढा आहे. या वेगाने सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर यायला ८ मिनिटे २० सेकंद लागतात. थोडक्यात सूर्य पृथ्वीपासून ८.२० प्रकाश मिनिटेच दूर आहे.

न्यूयॉर्क (अमेरिका) – मानवाने आतापर्यंत पृथ्वीसारखे असे बाह्यग्रह शोधले आहेत, जे त्यांच्या तार्यांभोवती प्रदक्षिणा घालतात. बाह्यग्रह म्हणजे ‘एक्जोप्लॅनेट’, म्हणजेच सूर्यमालेच्या (‘सोलर सिस्टम’च्या) बाहेर असलेले ग्रह. वर्ष १९९५ मध्ये असा पहिला बाह्यग्रह शोधण्यात अमेरिकेची ‘अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘नासा’ला यश आले. त्यानंतर जवळपास ३० वर्षांत मानवाला तब्बल ६ सहस्र बाह्यग्रहांचा शोध लागला. अर्थात् ब्रह्मांडातील अब्जावधी ग्रहांच्या तलुनेत हा आकडा अत्यंत छोटा आहे. तथापि गेल्या ५ वर्षांत या ग्रहांच्या शोधात गतीमानता पहायला मिळाली. ‘जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप’सारख्या (‘जे.डब्ल्यू.एस्.टी.’सारख्या) अंतराळात फिरणार्या दुर्बिणीच्या माध्यमातून शोधांची गती वाढली. अशात या दुर्बिणीच्या अतीप्रगत साधनांचा वापर करून संशोधक आता दूरवरच्या ग्रहांच्या भूगर्भशास्त्राचा शोध घेत आहेत. हे यापूर्वी कधीही शक्य झाले नव्हते.
बाह्यग्रहावर पृथ्वीसारखी भूगर्भीय क्रिया नाही !
जे.डब्ल्यू.एस्.टी. दुर्बिणीतून ‘एल्.एच्.एस्. ३८४४ बी’ या बाह्यग्रहाच्या पृष्ठभागाच्या रचनेचे विश्लेषण करण्यात यश आले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ४८.५ प्रकाशवर्षे दूर स्थित आहे. दुर्बिणीतील निरीक्षणांच्या तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना बाह्यग्रहाच्या पृष्ठभागावरून थेट येणारी उष्णता वेगळी करता आली. या पद्धतीमुळे वातावरणीय संकेतांवर अवलंबून न रहाता भूरचनेचा अभ्यास करणे शक्य झाले. संशोधकांनी पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांवरील ज्ञात खडकांच्या प्रकारांशी बाह्यग्रहाच्या अवरक्त (इन्फ्रारेड) नोंदींची तुलना केली. या परिणामांनी ‘ग्रॅनाईट’सारख्या सिलिका-समृद्ध पदार्थांना नाकारले, जे सामान्यतः पाण्यावर चालणार्या वातावरणात निर्माण होतात. यावरून हे लक्षात आले की, या ग्रहावर पृथ्वीसारखी भूगर्भीय क्रिया नाही.
ग्रहाचे तापमान ७२५ अंश सेल्सियसपर्यंत पोचते !
या बाह्यग्रहाच्या पृष्ठभागाच्या अभ्यासातून असे दिसून येते की, तो भरती-ओहोटीने बंदिस्त आहे, म्हणजेच त्याची एक बाजू सतत त्याच्या तार्याकडे तोंड करून असते. दिवसाच्या बाजूला अत्यंत उष्णता असते, जी अनुमाने ७२५ अंश सेल्सियसपर्यंत पोचते. याचा पृष्ठभागाच्या निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.
विविध निष्कर्षांवरून असे सूचित होते की, ग्रहावर एकतर घन खडक किंवा सैल पदार्थांचा थर असू शकतो, जे भविष्यातील निरीक्षणांद्वारे स्पष्ट होईल.
हा अभ्यास विश्वातील इतरत्र पृथ्वीसारखे वातावरण ओळखण्याच्या जवळ घेऊन जाणार !‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’द्वारे केलेल्या अभ्यासाचे यश भविष्यातील इतर बाह्यग्रहांच्या सूत्रांचे संशोधन करण्यास आराखडा प्रदान करत आहे. पुढे-पुढे बाह्यग्रह वस्तीयोग्यतेशी संबंधित आरंभीच्या रासायनिक खुणा शोधण्यातही साहाय्य करू शकेल. ग्रह शोधाचा हा पुढील टप्पा ग्रह प्रणालींच्या संदर्भातील आपली समज सुधारेल. हे आपल्याला विश्वातील इतरत्र पृथ्वीसारखे वातावरण ओळखण्याच्या क्षमतेच्या जवळ नेणारे आहे. |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !